डॉ. कल्याण गंगवाल यांना  जीवनगौरव पुरस्कार प्रदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

पुणे - नवी दिल्ली येथील बाबू जगजीवनराम साहित्य संस्कृती अकादमीतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना प्रदान करण्यात आला.

दिल्लीतील राजेंद्र भवनात झालेल्या कार्यक्रमात लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार आणि दिल्लीचे समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या हस्ते डॉ. गंगवाल यांना हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी बाबू जगजीवनराम कला, संस्कृती व साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नफेसिंह खोबा, पुण्यातील महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे उपस्थित होते. 

संगमनेर आणि अकोला तालुक्‍यातील आदिवासी ठाकर समाजासाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम गेली अनेक वर्षे डॉ. गंगवाल करीत आहेत. त्याचबरोबर समाजात अहिंसा रुजावी, व्यसनमुक्ती व्हावी आणि पशुबळीविरोधी चळवळ उभी राहावी, यासाठी डॉ. गंगवाल यांनी व्यापक कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

Web Title: pune news dr Kalyan Gangwal award