कुलगुरूंनी घेतले विद्यार्थ्यांसोबत जेवण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खानावळ (रिफेक्‍टरी) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. काही आंदोलनेदेखील झाली. त्या पार्श्‍वभूमीवर आज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी तेथे जाऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांसोबत जेवणही घेतले. 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खानावळ (रिफेक्‍टरी) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. काही आंदोलनेदेखील झाली. त्या पार्श्‍वभूमीवर आज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी तेथे जाऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांसोबत जेवणही घेतले. 

विद्यापीठाची अधिसभा चार दिवसांपूर्वी झाली. त्यानंतर सभेच्या ठिकाणी कुलगुरूंसह कर्मचारी जेवण घेत असताना, तीच वेळ साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सागर पवार आणि विक्रांत भिलारे यांनी काही कार्यकर्त्यांसह तिथे आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. विद्यार्थ्यांना एक हजार रुपयांत दोन वेळचे जेवण द्या, उर्वरित रक्कम विद्यापीठाने भरावी, अशी त्यांची मागणी होती. निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची त्यांनी तक्रार केली होती. 

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर बुधवारी (ता. 11) अचानक रिफेक्‍टरीमध्ये गेले. तेथील स्वच्छता, स्वयंपाकगृह तसेच अन्य सुविधांचा दर्जा उपलब्धता यांची पाहणी त्यांनी केली. नंतर विद्यार्थ्यांप्रमाणे जेवण घेण्यासाठी ते रांगेत उभे राहिले. विद्यार्थ्यांसमवेत त्यांनी जेवणही घेतले. याबाबत डॉ. करमळकर म्हणाले, ""काही दिवसांपासून रिफक्‍टेरीची पाहणी करण्याचे नियोजन करीत होतो. ते काम आज पूर्ण केले आहे.'' 

विद्यार्थ्यांना मिळणारे जेवण कसे आहे, तसेच तेथे योग्य सुविधा आहेत का, हे पाहण्याचा उद्देश होता. त्यासाठी तेथे जेवणही केले. जेवणाचा दर्जा चांगला वाटला. त्याबाबत विद्यार्थ्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. 
- डॉ. नितीन करमळकर (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) 

Web Title: pune news Dr. Nitin Karmalkar