पुणेकरांसाठी नाटकांची मेजवानी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

पुणे - मराठी रंगभूमीचा चाहते असलेल्या पुणेकरांनी नेहमीच नाट्यमहोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. म्हणूनच ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे यंदाच्या वर्षीही पुणेकरांसाठी खास पाच नाटकांचा समावेश असलेल्या विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवातील नाट्यप्रयोग ८ ते ११ जून व १३ जून रोजी रोज रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहेत. 

पुणे - मराठी रंगभूमीचा चाहते असलेल्या पुणेकरांनी नेहमीच नाट्यमहोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. म्हणूनच ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे यंदाच्या वर्षीही पुणेकरांसाठी खास पाच नाटकांचा समावेश असलेल्या विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवातील नाट्यप्रयोग ८ ते ११ जून व १३ जून रोजी रोज रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहेत. 

पुणेकरांचे नाटकप्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे येथील चाहत्यांनी नेहमीच दर्जेदार नाटकांना डोक्‍यावर घेतलेले आहे. पुणेकर रसिकांना दर्जेदार नाटकांची मेजवानी देणाऱ्या या विशेष नाट्यमहोत्सवात लोकप्रियतेचा उच्चांक गाठणाऱ्या मुक्ता बर्वे व अजय पुरकर यांच्या ‘कोडमंत्र’ (८ जून) सह, प्रशांत दामले व शुभांगी गोखले यांचे ‘साखर खाल्लेला माणूस’ (९ जून), स्पृहा जोशी व उमेश कामत यांचे ‘डोन्ट वरी बी हॅपी’ (१० जून), जितेंद्र जोशी व गिरिजा ओक-गोडबोले यांचे ‘दोन स्पेशल’ (११ जून), मुलगी व वडिलांचे नाते उलगडणारे प्रशांत दामले व तेजश्री प्रधान यांचे ‘कार्टी काळजात घुसली’ (१३ जून) या पाच नाटकांचा समावेश आहे.

या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक पीएनजी ज्वेलर्स आहेत, तर एसटीए हॉलिडेज, निरामय वेलनेस सेंटर आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सहप्रायोजक आहेत. महोत्सवासाठी पूर्णोत्सव प्रवेशिका तसेच प्रत्येक नाटकाच्या स्वतंत्र प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर येथे उपलब्ध आहेत. पूर्णोत्सव प्रवेशिकेसाठी रु. १२००, तर प्रत्येक दिवसाच्या प्रवेशिका रु. ३०० रुपये व रु.२५० (बाल्कनीसाठी) असे शुल्क आहे.

नाटक व वृत्तपत्र ही एका अर्थी हातात हात घालून चालणारी माध्यमे आहेत. दोहोंचाही मराठी जनमानसावर प्रभाव आहे. त्यामुळे आपल्या नाटकांना ‘सकाळ’चे व्यासपीठ मिळणे ही नाट्यसृष्टीसाठी मोठीच सकारात्मक गोष्ट ठरणार आहे. ‘सकाळ’च्या विश्वासार्हतेमुळे रसिकांना नाटकाच्या दर्जाची खात्रीच यातून मिळणार आहे.
- उमेश कामत 

‘सकाळ’ नाट्यमहोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. त्या वर्षातील सर्वोत्तम व्यावसायिक नाटके पुण्यातील रसिकांना या महोत्सवात एकत्रित व सलग पाहता येतात. त्यामुळे आता पुण्यातील नामवंत सांस्कृतिक उपक्रमात ही महत्त्वाची भर पडली आहे. त्यातून महोत्सवाचे स्वरूप असल्याने एरवीच्या प्रयोगांपेक्षा रसिकांइतकाच कलाकारांचाही उत्साह कदाचित अधिक असतो. 
- मुक्ता बर्वे

Web Title: pune news drama mahaotsav