कुलकर्णी दांपत्यांनी सहकार्य न केल्याचा पोलिसांचा दावा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

पुणे - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे पोलिसांनी रविवारपर्यंत कसून चौकशी केली. यात कुलकर्णी यांनी योग्य सहकार्य केले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी (ता. 13) कुलकर्णी दांपत्य उच्च न्यायालयात हजर राहणार आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडून डीएसके दांपत्याची पाच दिवसांपासून चौकशी सुरू होती. दररोज सकाळी अकरा ते एक आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाचपर्यंत ही चौकशी रविवारपर्यंत करण्यात आली. गुन्हे शाखेचे अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ आणि सहायक आयुक्‍त नीलेश मोरे यांच्या दोन टीमकडून त्यांची चौकशी करण्यात आली.

या चौकशीमध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या आरोपांची, त्यांच्या बॅंकांतील ठेवी, तसेच त्यांनी गुंतवणूकदारांच्या ठेवींचे काय केले, यासह विविध प्रश्‍न पोलिसांनी विचारले. मात्र, कुलकर्णी दांपत्याने "पाहून सांगू', "नंतर सांगतो' अशा पद्धतीने उत्तरे देत योग्य सहकार्य केले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: pune news dsk family police crime