डीएसकेंच्या गाड्या ताब्यात

car
car

पुणे - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याकडे असलेल्या पाच आलिशान गाड्या आणि एक दुचाकी आर्थिक व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामध्ये बीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयाटो कॅमरी, एमव्ही ऑगस्टा या गाड्यांचा समावेश असून, त्यांची किंमत साडेपाच कोटी रुपयांहून अधिक आहे. 

पोलिस कोठडीत असलेल्या डीएसके व त्यांच्या पत्नीची सध्या चौकशी सुरू आहे. यामध्ये डीएसके यांच्याकडे महागड्या गाड्या असल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी या गाड्या ताब्यात घेतल्याची माहिती आर्थिक व गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांनी दिली. 

चकाचक, दिसायला तितक्‍याच दिमाखदार आणि वेगवेगळ्या प्रकारांमध्ये असलेल्या या गाड्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पांढऱ्या शुभ्र रंगाची ‘बीएमडब्ल्यू’, लालभडक ‘पोर्शे’, राखाडी रंगाची ‘टोयाटो कॅमरी’ तर ‘एमव्ही ऑगस्टा’ ही दुचाकी अशा आलिशान गाड्यांचा ताफा डीएसकेंकडे आहे. यापैकी काही आलिशान गाड्यांना १००१ हा क्रमांक आहे. या क्रमांकास व जगातील आलिशान गाड्यांना डीएसके कुटुंबीयांकडून अधिक पसंती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com