उपमहापौरपदासाठी डॉ. धेंडे, राजगुरू रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

पुणे - पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) पालिकेतील गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे नाव निश्‍चित झाले आहे. भारतीय जनता पक्ष आणि ‘आरपीआय’च्या वतीने डॉ. धेंडे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीने लता राजगुरू यांना उमेदवारी दिली आहे. महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने डॉ. धेंडे यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे. 

नवनाथ कांबळे यांच्या आकस्मिक निधनामुळे उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी डॉ. धेंडे आणि नगरसेविका सुनीता वाडेकर यांच्या नावांची चर्चा होती. परंतु, गटनेतेपद महत्त्वाचे असल्याने डॉ. धेंडे उपमहापौरपदासाठी फारसे इच्छुक नव्हते. त्यामुळे हे पद मिळविण्यासाठी वाडेकर यांनी पक्षाच्या नेत्यांकडे फिल्डिंग लावली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींना डॉ. धेंडे यांच्या नावाला पसंती दिली. त्यानुसार डॉ. धेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पालिकेच्या नागपूर चाळ-फुलेनगर या प्रभागातून (क्र. २) डॉ. धेंडे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. या पदासाठी बुधवारी (ता. १४) पालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवडणूक होणार आहे.

Web Title: pune news dy. mayor election