ई-मेलच्या माध्यमातून प्रॉपर्टी कार्ड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

पुणे - सदनिका अथवा जमिनीची खरेदी-विक्री झाल्यानंतर खरेदीदाराला आता मिळकत पत्रिकेवर (प्रॉपर्टी कार्ड) नाव लावण्यासाठी वणवण फिरण्याची गरज राहणार नाही. कारण, दस्त रजिस्टर झाल्यानंतर तत्काळ नोंदणी विभागाकडून भूमी अभिलेख विभागाला या व्यवहाराची माहिती ई-मेलच्या माध्यमातून मिळणार आहे. वाद नसेल, तर २५ दिवसांत खरेदीदारांची नोंद मिळकत पत्रिकेवर केली जाणार आहे.

भूमी अभिलेख विभागाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर पुणे आणि मुंबईत ही योजना हाती घेतली आहे. त्यासाठी मिळकत पत्रिकेवर नोंद घालण्यासाठीचा कालावधी ३० दिवसांवरून २५ दिवसांवर आणला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यात सर्वत्र त्याची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे मिळकतीच्या पत्रिकेवर मालकी हक्काची नोंद घालण्याची प्रक्रिया सुटसुटीत आणि पारदर्शी होणार आहेत.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये भूमी अभिलेख विभागाने प्रॉपर्टी कार्ड तयार केले आहेत. तसेच, कोणत्याही प्रकाराच्या व्यवहारांसाठी सरकारने आधारकार्ड बंधनकारक केले आहेत. त्या पुढचे पाऊल टाकत भूमी अभिलेख विभागाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. सध्या पुणे शहरात सदनिका अथवा जमिनीच्या खरेदी-विक्रीनंतर दस्ताची प्रमाणित प्रत घेऊन भूमी अभिलेख विभागात सादर करावी लागते. त्यानंतर विभागाकडून नोटिसा काढून १५ दिवसांची मुदत दिली जाते. मुदतीत आक्षेप दाखल न झाल्यास प्रॉपर्टी कार्डावर संबंधित खरेदीदारांची नोंद केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास लागणार कालावधी आणि त्यातून गैरप्रकार होतात. ते आता थांबणार आहेत.

Web Title: pune news e-mail property card

टॅग्स