अन्नधान्य वितरणासाठी अडीच हजार ई-पॉस मशिन दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

पुणे - राज्यभरात स्वस्त अन्नधान्य वितरणामध्ये पारदर्शकता येण्यासाठी "इलेक्‍ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल अर्थात ई पॉस मशिन' बसविण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी 2 हजार 500 मशिन शिवाजीनगर येथील शासकीय गोदामामध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल झाल्या आहेत. 

पहिल्या टप्प्यामध्ये पुणे विभागातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे मशिन बसविण्यात आल्या आहेत. परंतु सोलापूर आणि पुण्यामध्ये एकही मशिन बसविण्यात आले नव्हते. हैदराबादच्या "लिंकवेल' कंपनीच्या 2 हजार 500 मशिन पुणे विभागाला प्राप्त झाल्या आहेत. जिल्हा अन्नधान्य वितरण विभागाकडून येत्या आठवड्याभरात जिल्हा आणि शहरातील रेशन दुकानांमध्ये ई पॉस मशिन बसविण्यात येणार आहेत. 

या संदर्भात जिल्ह्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी दिनेश भालेदार म्हणाले, ""हैदराबादच्या "लिंकवेल' कंपनीच्या "ई पॉस' मशिन दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील 1 हजार 745 दुकानांमध्ये या मशिन बसविण्यात येणार आहेत. जिल्ह्यासाठी सध्या 1 हजार 421 मशिन मिळाल्या आहेत. त्याचे संपूर्ण प्रशिक्षण रेशन दुकानदारांना येत्या आठवड्यात दिले जाईल. त्यानंतर दुकाननिहाय क्रमांकांनुसार प्रत्यक्षात मशिन बसविण्यात येतील. उर्वरित 324 मशिन नंतरच्या टप्प्यात बसविले जातील.'' 

पुणे विभागातील शहरातील दुकानांसाठी एक हजार ई पॉस मशिन प्राप्त झाल्या आहेत. येत्या आठवड्यामध्ये हवेलीमधील रेशन दुकानदारांना प्रशिक्षण देऊन मग मशिन बसविल्या जातील. लिंकवेल कंपनीच्या व्हिजनटेकच्या मशिन आहेत. तांत्रिक तपासणीनंतर येत्या महिन्याभरात ई पॉस मशिन सर्व रेशन दुकानांमध्ये बसविल्या जातील. 
शहाजी पवार, अन्नधान्य वितरण अधिकारी (शहर)

Web Title: pune news e-posing machines food grains