ई-वेस्ट कलेक्‍शन सेंटर होणार सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

पुणे - शहरात गेल्या काही काळात ई-कचऱ्याचे प्रमाण वाढल्याचे महापालिकेकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. खासगी संस्थांच्या सहकार्यातून त्याचा पुनर्वापर करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी विविध भागांत ‘ई-वेस्ट कलेक्‍शन सेंटर’ सुरू करण्यात येणार आहेत. पुढील वर्षभरात शंभर टक्के ई-कचरा जमा करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ठ आहे.

शहरात माहिती तंत्रज्ञान उद्योगाची भरभराट होत असतानाच ई-कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच ‘मोबाईल इंडस्ट्री’ ज्या प्रमाणात वाढत राहिली, त्या प्रमाणात कचऱ्याची समस्याही जाणवू लागली आहे. गेल्या पाच वर्षांत ई-कचऱ्याचे प्रमाण चारपट वाढले असून, त्यात संगणक, लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल, फ्रिज, वॉशिंग मशिन, ओव्हन या वस्तूंचा समावेश आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वर्षाकाठी साधारणतः पाच हजार टन ई-कचरा जमा होतो. त्यात हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क, खराडीतील युऑन आयटी पार्कसह बाणेर-बालेवाडी, कोथरूड या परिसरात हा कचरा जमा होत असल्याचे पाहणीतून आढळून आले आहे. शहरातील ई-कचरा, त्याचे स्वरूप, प्रमाण आणि प्रक्रिया प्रकल्पाच्या अभ्यासासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, स्वच्छ आणि इतर संस्थांच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली. त्यातील निष्कर्षांच्या आधारे प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: pune news e-waste collection center start