आम्हीही बनविणार इको फ्रेंडली गणपती!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पुणे- ‘‘आजपर्यंत आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करीत होतो; मात्र, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तीचे महत्व जाणले आणि यंदापासून इको फ्रेंडली मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प केला आहे. लहान मुलांनाही याचे महत्त्व कळावे, यासाठी ‘सकाळ’तर्फे आयोजित इको फ्रेंडली गणपती बनविण्याच्या कार्यशाळेसाठी माझ्या दोनही मुलींची नावनोंदणी केली आहे,’’ अशी भावना परेश तुळजापूरकर यांनी व्यक्त केली. 

विद्यार्थ्यांमधील कलागुण विकसित व्हावेत, या उद्देशाने ‘सकाळ’तर्फे हा उपक्रम वीस ऑगस्ट रोजी राबविण्यात येत आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सहयोगी प्रायोजक आहेत. ही कार्यशाळा नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत ही कार्यशाळा होईल. सिटी इंटरनॅशनल स्कूल (कोथरूड), पुणे सेंट्रल मॉल (कर्वे रस्ता), अभिरुची मॉल मल्टिप्लेक्‍स (सिंहगड रस्ता), एसएसएमएस सनविध इंग्लिश मीडियम स्कूल (पर्वती), नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल (निगडी), सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी), ईस्ट कोर्ट- फिनिक्‍स मार्केट सिटी (विमाननगर), माउंट लिटेरा झी स्कूल (वाकड)  या ठिकाणी ही कार्यशाळा  होणार आहे. 

कार्यशाळेत सहभागी होण्याकरिता नावनोंदणी आवश्‍यक आहे. त्यासाठी ५० रुपये प्रवेश शुल्क आहे.विद्यार्थ्यांनी येताना सोबत कंपास पेटी, नॅपकिन, पाण्याची बाटली, जुने वर्तमानपत्र, बाऊल, ब्रश आणावेत. कार्यशाळेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शाडू माती ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. कार्यशाळेनंतर तयार केलेल्या गणेशमूर्ती विद्यार्थी घरी घेऊन जाऊ शकतील. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे.

नावनोंदणीचे ठिकाण व वेळ 
पुणे सेंट्रल मॉल (कर्वे रस्ता) (दुपारी एक ते रात्री आठ)
अभिरुची मॉल मल्टिप्लेक्‍स (सिंहगड रस्ता) 
(सकाळी अकरा ते सायंकाळी सात)
एसएसएमएस सनविध इंग्लिश मीडियम स्कूल 
(सकाळी दहा ते दुपारी दोन)
नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल (निगडी) 
(सकाळी अकरा ते दुपारी तीन)
सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी) (सकाळी दहा ते दुपारी चार)
ईस्ट कोर्ट- फिनिक्‍स मार्केट सिटी (विमाननगर) (दुपारी चार ते रात्री आठ) (नावनोंदणी १२ ते १७ ऑगस्टपर्यंत करावी)
(नावनोंदणी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊनच करावी,  फोनवर होणार नाही. )
 काय ः सकाळ इको गणपती २०१७
    कधी ः रविवारी (ता. २०) सकाळी दहा ते ११ः३० पर्यंत.
    संपर्क ः ८८०५००९३९५
    व्हॉट्‌सॲप क्रमांक ः ९१४६०३८०३३

Web Title: pune news eco friendly ganpati children