सीबीएसई दहावीत विद्यार्थिनींची बाजी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात पुण्यातील बहुतांश शाळांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येची शंभरी गाठली आहे. परीक्षेत 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. यात विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. 

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात पुण्यातील बहुतांश शाळांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येची शंभरी गाठली आहे. परीक्षेत 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. यात विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. 

सीबीएसईशी संलग्न शाळांतील विद्यार्थ्यांचा निकाल 'सीजीपीए' (क्‍युम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट ऍव्हरेज) पद्धतीने जाहीर केला जातो. लोहगाव येथील केंद्रीय विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेतील दहावीला बसलेली सर्व 124 विद्यार्थी उत्तीर्ण झाली असून, दहा विद्यार्थ्यांना 10 सीजीपीए गुण मिळाले आहेत. यात श्‍वेता कुमारी अब्दुल्ला तनवर, अनुग्या अनुपम, सृष्टी कटियार, आकृतीकुमारी, अपारी शांती, मानसी आगलावे, अंगुलीरी वीणा गायत्री, लवकुश शर्मा यांचा समावेश आहे. 

आर्मी पब्लिक स्कूलचा निकालही शंभर टक्के आहे. शाळेतील 344 जणांनी दहावीची परीक्षा दिली. यातील 27 विद्यार्थ्यांनी मंडळाची परीक्षा दिली. सर्व जण उत्तीर्ण झाले असून, 44 विद्यार्थ्यांना '10 सीजीपीए' मिळाले आहे, असे प्राचार्या बिनिता पुणेकर यांनी सांगितले. 'सरहद'च्या मुख्याध्यापिका कविता वानखेडे यांनी शाळेचा निकाल शंभर टक्के लागल्याचे सांगितले. किंजल कनानी '10 सीजीपीए' मिळवत शाळेत प्रथम आली आहे. साक्षी भागवत हिला द्वितीय आणि दिव्या झिंजे हिला तृतीय क्रमांक मिळाला आहे. 

ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतील सर्व 77 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेला बसलेल्या 29 विद्यार्थ्यांना 90 टक्‍क्‍यांच्या वर गुण आहेत. ईशान पेंडसे हा शाळेत प्रथम, स्वप्ना गद्रे द्वितीय, तर साक्षी भोसले ही तृतीय क्रमांक मिळाल्याचे प्राचार्य डॉ. मिलिंद नाईक यांनी सांगितले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली नाही. मुलींच्या निकालाची सरासरी कायम, पण मुलांच्या निकालाची सरासरी कमी झाली आहे, असे डॉ. नाईक यांनी सांगितले. 

प्रथमेश इंगळे प्रथम 
पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कूलने यशाची परंपरा कायम राखली असून, शाळेचा निकाल शंभर टक्के आहे. शाळेतील प्रथमेश इंगळे 90 टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे. विखे पाटील मेमोरियल स्कूलमध्ये अथर्व ओक प्रथम, मानसी कोठारी द्वितीय आणि आर्यमान वेलामपल्लीने तृतीय क्रमांक मिळविला आहे. या शाळेचा निकालही शंभर टक्के आहे.

Web Title: pune news education news cbse results pune education sakal esakal