वीजबिलावरील पत्ता बदला एका क्‍लिकवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

पुणे - वीजबिलावर चुकीचा पत्ता येतोय ? त्यामध्ये दुरुस्ती करायची आहे? काळजीचे कारण नको. आता एका एसएमएसद्वारे तुम्ही ही दुरस्ती करू शकता. अर्थात, ही सुविधा महावितरणकडे ज्या ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली त्यांनाच वापरता येणार आहे. 

ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याच्या प्रयत्नातून महावितरण नवनवीन उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणच्या वीजबिलावरील ग्राहकाच्या पत्त्याची दुरुस्ती करण्याचा उपक्रम हाती घेतला गेला आहे. 

गेल्या दोन दिवसांत राज्यातील सुमारे ५२ हजार ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला. मोबाईल क्रमांक नोंदविलेल्या ग्राहकांना महावितरण एसएमएस पाठवित आहे. या एसएमएसवरील लिंक ओपन केल्यास त्यावर ग्राहकाचा पत्ता उपलब्ध होईल. त्या पत्त्यात दुरुस्ती करण्याची सुविधा या लिंकद्वारे ग्राहकांना देण्यात आली आहे.

बिलांमध्ये येईल अचूकता
वीजबिलावरील पत्त्याची दुरुस्ती झाल्यामुळे वेळेत बिल मिळणे, योग्य वेळेत रीडिंग करणे या प्रक्रियेत अचूकता येईल. राज्यात महावितरणचे सुमारे २ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. त्यापैकी १ कोटी ९५ लाख ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईलची नोंदणी महावितरणकडे केली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असेही आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: pune news electricity bill address