मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

पुणे - महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील सुमारे बत्तीस हजार कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. रोजंदारी कामगार म्हणून समाविष्ट करून घ्यावे, ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने दिला आहे.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत अभ्यास करण्यासाठी काही प्रमुख संघटनांच्या प्रतिनिधींसह समिती स्थापन केली होती. महानिर्मितीचे कार्यकारी संचालक मनोज रानडे यांनी याबाबतचा अहवाल ऊर्जा मंत्रालयास 
दिला आहे. परंतु सरकार आर्थिक बोजाचे कारण सांगून अद्याप या  कंत्राटी कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे २२ मे पासून राज्यभरातील कंत्राटी कामगार बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. 

याबाबत संघाचे उपमहामंत्री उमेश आणेराव म्हणाले, ‘‘तिन्ही वीज कंपन्यांत कंत्राटी कामगार दहा ते तीस वर्षांपासून कार्यरत आहेत; परंतु त्यांना कायम केलेले नाही. या कामगारांचे भविष्य सुधारावे, यासाठी त्यांना कायम करून घ्यावे. ही आमची मागणी आहे. त्यासाठी हे आंदोलन पुकारले आहे.’’

Web Title: pune news electricity employee agitation