नारळाची झाडे ठरली त्यांच्यासाठी जीवनदायी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

सांगवी - वार गुरुवार, वेळ संध्याकाळी सातची, सांगवी गावातील वाघवस्तीत वादळी वारे वाहायला लागले आणि पाहता पाहता विजांचे तांडव पाहत असलेल्या चंदर गंगाराम तावरे यांच्या कुटुंबातील सारेच हादरले. कारण, घराच्या अगदी समोरच काही फुटांवर लख्ख प्रकाश पडला. नागमोडी वळणे घेत वीज थेट दोन नारळाच्या झाडांवर कोसळली. नारळाची दोन्ही झाडे पेटली.

पावसाच्या मध्यम सरी कोसळत असतानाही त्या पाण्याने ही झाडे विझलीच नाहीत. आपले काय झाले असते या नुसत्या कल्पनेनेच तावरे कुटुंबातील प्रत्येकाला गारवा पसरलेल्या वातावरणातही घाम फुटला. नियतीचा खेळ कसा असतो याचा अनुभव निलंग्यात आला असतानाच सांगवीतील शेतकरी असलेल्या तावरे कुटुंबालाही हाच अनुभव आला. गुरुवारी संध्याकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे सांगवी परिसरात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. मात्र, पावसाळ्यापूर्वीचा हा पहिला पाऊस सांगवीकरांच्या चांगलाच स्मरणात राहिला.

Web Title: pune news electroluction on coconut tree