अर्जाचा भाग दोन भरताना पंसतीक्रम द्यावा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा भाग दोन भरताना महाविद्यालयांचे पंसतीक्रम द्यायचे आहेत. त्यासाठी संगणकाची मदत घ्यावी लागते. अर्ज भरताना संगणकावर दिसणाऱ्या सूचना समजून घेऊन योग्य ठिकाणी क्‍लिक करावे लागते. त्याबद्दलची ही माहिती...
- जगदीश चिंचोरे, सदस्य, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती

अकरावी प्रवेश - पसंतीक्रम

गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना एकाच अर्जाद्वारे दोन शाखांसाठी अर्ज करता येत होते. परंतु या वर्षी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रम यातील एका शाखेसाठी ऑनलाइन अर्ज भरता येईल.

अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा भाग दोन भरताना महाविद्यालयांचे पंसतीक्रम द्यायचे आहेत. त्यासाठी संगणकाची मदत घ्यावी लागते. अर्ज भरताना संगणकावर दिसणाऱ्या सूचना समजून घेऊन योग्य ठिकाणी क्‍लिक करावे लागते. त्याबद्दलची ही माहिती...
- जगदीश चिंचोरे, सदस्य, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती

अकरावी प्रवेश - पसंतीक्रम

गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना एकाच अर्जाद्वारे दोन शाखांसाठी अर्ज करता येत होते. परंतु या वर्षी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रम यातील एका शाखेसाठी ऑनलाइन अर्ज भरता येईल.

शाखा निवडल्यानंतर तुम्हाला महाविद्यालयांची यादी संगणकावर दिसेल. तिथे अनुदानित (एडेड), विनाअनुदानित (अनएडेड) आणि ऑल, असे दोन पर्याय दिसतील. यातील एका पर्यायावर क्‍लिक करा.

अनुदानित (एडेड), विनाअनुदानित (अनएडेड) आणि ऑल यापैकी एकावर क्‍लिक केल्यास त्याप्रमाणे महाविद्यालयांची यादी दिसेल. त्या ठिकाणी ‘एडेड’वर क्‍लिक केल्यास तो तुमचा पसंतीक्रम म्हणून दिसेल. तेथील महाविद्यालयांच्या यादीतूल एक ते दहा पसंतीक्रम विद्यार्थी भरू शकतो.

तुम्ही भरलेले पसंतीक्रम बरोबर आणि तुमच्या दृष्टीने योग्य असल्यास ‘सेव्ह’ करा. त्यानंतर ‘कन्फर्म’ करा आणि ‘सबमिट’ या शब्दावर क्‍लिक करा.

पसंतीक्रम एकदा सबमिट केल्यावर पुन्हा बदलता येत नाही. परंतु त्यात दुरुस्ती आवश्‍यक असेल, तर त्याचा योग्य तो कागदोपत्री पुरावा घेऊन शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत चालविण्यात येणाऱ्या मार्गदर्शन केंद्रावरून विहित वेळेतच दुरुस्ती करून घेता येईल.

अर्जात दुरुस्ती केल्यानंतर संपूर्ण प्रवेश अर्ज पुन्हा सबमिट करावा लागतो. ही प्रक्रिया केल्यानंतर सुधारित अर्जाची प्रत काढून ती माहितीसाठी स्वतःकडे ठेवा.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्जात दिलेल्या मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे अर्जाची पोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावरही अर्जाची पोच दिसू शकेल.

कोटा प्रवेश पद्धत...

इनहाऊस (२० टक्के), व्यवस्थापन (५ टक्के), अल्पसंख्याक (५० टक्के), तांत्रिक अभ्यासक्रम (२५ टक्के) या कोट्यातील सर्व प्रवेश शून्य फेरीतच होणार आहेत. शून्य फेरी म्हणजे पहिल्या फेरीच्या आधीची फेरी. 

यातील कोणत्याही कोट्यातून प्रवेश घ्यायचा असेल, तर ऑनलाइन अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरायचाच आहे. परंतु प्रवेशाच्या संकेतस्थळावर कोटा प्रवेशाच्या अर्जाचा नमुना आहे. तो भरून त्यासोबत ऑनलाइन अर्जाची प्रत जोडून संबंधित महाविद्यालयात तो अर्ज सादर करावयाचा आहे.

ज्या विद्यार्थ्याला यापैकी कोणत्याही कोट्यातून प्रवेश मिळाला असेल, त्याने पूर्ण शुल्क भरून संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे.

व्यावसायिक अकरावीचे (एमसीव्हीसी) प्रवेश या वर्षापासून प्रथमच केंद्रीय प्रवेश पद्धतीने होत आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे दहावीत तांत्रिक विषय होते, त्यांच्यासाठी एमसीव्हीसी वा द्विलक्ष्यी अभ्यासक्रमासाठी २५ टक्के जागा राखीव आहेत.

Web Title: pune news eleventh admission form submission information