रोजगारनिर्मितीसाठी ‘सोलर चरखा’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

पुणे - ग्रामीण भागातील महिलांसाठी सोलर चरखा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणारा आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे राज्यात सोलर चरख्याच्या माध्यमातून रोजगाराचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा मानस असल्याची माहिती मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांनी दिली.

केंद्रीय सूक्ष्म व लघुउद्योग मंत्री गिरिराज सिंह आणि नीती आयोगाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्यासह चोरडिया यांनी बिहार राज्यातील नवादा जिल्ह्यातील खनवा गावात उभारलेल्या सोलर चरखा प्रकल्पाचा अभ्यास दौरा केला. तसेच, खनवा गावातील शेणखत, गोमूत्र व मानवी केसांचा वापर केला जाणाऱ्या अमीनो ॲसिड प्रकल्पाला भेट देऊन या संबधीची माहिती घेतली.

राज्यात खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात असून, सोलर चरखा प्रकल्प राज्यभरात मोठ्या प्रमाणात राबवून रोजगारनिर्मिती करण्यात येणार असल्याचे, चोरडिया यांनी सांगितले. या वेळी, राज्यातील सर्व नवीन रोजगार प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याबाबत गिरिराज सिंह यांनी आश्वासन दिले.

सोलर चरख्यापासून महिलांसाठी घरच्या-घरी रोजगार निर्माण होत असून कापूस ते कापड प्रक्रिया नवादा येथे राबविण्यात आली आहे. तसेच, खनवा  येथे एक हजार चरखे बसवण्यात आल्याची माहिती विजय पांडे यांनी दिली.

Web Title: pune news employment generation solar charakha