'पर्यावरणाचा अहवाल वॉर्डनिहाय करा '

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पुणे - ""शहरात विविध स्वरूपाची विकासकामे करतानाच वॉर्डनिहाय पर्यावरणाचा अहवाल तयार करायला हवा. ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपापल्या परिसरातील पर्यावरणाची स्थिती जाणून घेता येईल. अहवाल तयार करण्याच्या प्रक्रियेत नागरिकांनाही सामावून घेतले पाहिजे,'' असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी गुरुवारी व्यक्त केले. 

महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जयंतराव टिळक पुरस्कारांचे वितरण महापौर मुक्ता टिळक आणि गाडगीळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी गाडगीळ बोलत होते. नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, ज्योत्स्ना एकबोटे, गायत्री खडके, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. महापालिकेच्या उद्यान विभागाचे माजी प्रमुख यशवंत खैरे, कर्नल सुरेश पाटील (निवृत्त), हेमा साने, आनंद चोरडिया यांना टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

गाडगीळ म्हणाले, ""पुणे शहराचा वेगाने विस्तार होत असून, नागरीकरणही वाढले आहे. मात्र, पर्यावरणाकडे कुठे दुर्लक्ष होणार नाही, याची तितक्‍याच गांभीर्याने काळजी घेण्याची गरज आहे. या आधी काही मंडळींनी पर्यावरणाचा अहवाल तयार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याकडे पुरेशी पार्श्‍वभूमी नसल्याने यश आले नाही. त्यासाठी आता वॉर्ड पातळीवर अहवाल करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा. त्याबाबतची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करावी.'' 

""जैवविविधतेच्या संदर्भातील कामे करणाऱ्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. त्यातून नवी चळवळ उभी राहील. जैवविविधेबाबत कायदा करण्यात आला. पण, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही,'' अशी खंत डॉ. गाडगीळ यांनी व्यक्त केली. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. एकबोटे यांनी आभार मानले. 

Web Title: pune news environment Dr. Madhav Gadgil