पुण्यातील आयटी पार्कमध्ये सहकाऱ्यांकडून महिलेचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

कंपनीमध्ये सोबत काम करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांनी महिलेचा विनयभंग केला आहे.

पुणे : पुण्यातील उच्चभ्रू लोकवस्तीत महिलांचे विनयभंग होण्याचे दोन प्रकार समोर आले आहेत. एका परदेशी महिलेचा प्राध्यापकाकडून विनयभंग झाल्याची घटना घडली असतानाच आयटी कंपनीतील एका महिलेचा सहकाऱ्यांकडूनच सामूहिक विनयभंग करण्यात आल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. 

पुण्यातील खराडी येथील इऑन आयटी पार्कमधील अॅनालिटिक्स कंपनीमध्ये एका संगणक अभियंता महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. कंपनीमध्ये सोबत काम करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांनी महिलेचा विनयभंग केला आहे, अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 

या प्रकरणात पीडित महिलेच्या तक्रारीवरून अॅनालिटिक्स कंपनीतील पाच संशयित आरोपींविरोधात चंदननगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे दाखल केले असून, कोथरुडमधील आरोपीस ताब्यात घेतले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news eon it park woman molestation crime against women