ईव्हीएमचा अहवाल न दिल्यास आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

पुणे - महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये गैरप्रकार झाला असल्याने त्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. मात्र, त्याची दखल घेतली नाही. याबाबत, येत्या तीन दिवसांत आयुक्तांनी अहवाल सादर करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने सर्वपक्षीय लढा दिला जाईल, असा इशारा जागरूक पुणेकर नागरिक समितीतर्फे रूपाली पाटील आणि दत्तात्रेय बहिरट यांनी दिला. या वेळी ‘युक्रांद’चे जांबुवंत मनोहर, राहुल तुपेरे, प्रशांत कनोजिया आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाल्या, ‘‘आगामी निवडणुकीत ईव्हीएम मशिन बंद करून बॅलेट पेपरचा वापर करण्याबाबत राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय आंदोलन करणार आहे.’’

Web Title: pune news evm report agitation