दिवाळी सुटीनिमित्त रेल्वेच्या जादा गाड्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

पुणे - दिवाळी सुटीत वाढणारी प्रवासी संख्या विचारात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने पाच दिवाळी विशेष साप्ताहिक गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याहून नागपूर, जम्मूतावी, गोरखपूर, वाराणसी आणि मंडुआडीह या मार्गांवर गाड्या सोडल्या जाणार आहेत.

1) पुणे-जम्मूतावी सुपरफास्ट -

पुणे - दिवाळी सुटीत वाढणारी प्रवासी संख्या विचारात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने पाच दिवाळी विशेष साप्ताहिक गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याहून नागपूर, जम्मूतावी, गोरखपूर, वाराणसी आणि मंडुआडीह या मार्गांवर गाड्या सोडल्या जाणार आहेत.

1) पुणे-जम्मूतावी सुपरफास्ट -
ही एक्‍स्प्रेस गाडी ता. 11 ते 17 ऑक्‍टोबरदरम्यान धावणार आहे. या गाडीच्या प्रत्येकी सहा फेऱ्या होतील. दर बुधवारी सकाळी सव्वापाच वाजता पुणे स्टेशनवरून ही गाडी सुटेल. ती गुरुवारी सायंकाळी सहा वाजता जम्मूतावीला पोचेल. जम्मूतावी येथून शुक्रवारी सकाळी सात वाजून 20 मिनिटांनी तेथून पुण्यासाठी रवाना होऊन शनिवारी रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी पुण्यात दाखल होईल.

2) पुणे-अजनी (नागपूर) एक्‍स्प्रेस -
ही गाडी ता. 15 ते 23 ऑक्‍टोबर या कालावधीत पुणे व नागपूर येथून प्रत्येकी पाच फेऱ्या करणार आहे. पुणे स्टेशनवरून दर रविवारी रात्री पावणेदहा वाजता सुटेल आणि सोमवारी दुपारी एक वाजून 40 मिनिटांनी ती नागपूरला पोचेल. नागपूर येथून सोमवारी दुपारी चार वाजून 15 मिनिटांनी सुटून पुण्यात मंगळवारी सकाळी पावणेनऊ वाजता दाखल होईल.

3) पुणे-गोरखपूर-पुणे -
ही रेल्वे गाडी ता. 15 ऑक्‍टोबर ते सात नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे. या गाडीच्यादेखील प्रत्येकी आठ फेऱ्या होणार आहेत.

4) पुणे-वाराणसी -
ही गाडी ता. 12 ऑक्‍टोबर ते 04 नोव्हेंबरदरम्यान धावणार आहे. या गाडीच्या प्रत्येकी आठ फेऱ्या होतील.

5) लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर -
ही गाडी पुणे मार्गे जाणार असून, ता. 14 ऑक्‍टोबर ते 4 नोव्हेंबरदरम्यान धावणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली.

Web Title: pune news extra railway for diwali holiday