इंदापूरमध्ये पाण्यासाठी उपोषणासाठी बसलेले तिघेजण रुग्णालयात

राजकुमार थोरात
रविवार, 25 मार्च 2018

पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व  आरोग्य  समिती सभापती प्रवीण माने यांनी रात्री उशीरा भेट देवून शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्‍नासाठी अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. मात्र चोपडे शेतकरयांची मागणी ही ऐकून घेण्यासाठी तयार नव्हते. तसेच तीन दिवसामध्ये पाटबंघारे विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी उपोषण ठिकाणी फिरकला नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

वालचंदनगर ; निरवांगी (ता.इंदापूर) येथे नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी सुरु असलेल्या  उपोषणामधील तीन शेतकऱ्यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हारुग्णालयामध्ये शनिवारी (ता.२४) रोजी रात्री ९ वाजता दाखल करण्यात आले.

नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी निरवांगी (ता.इंदापूर) येथे  नदीकाठच्या शेतकऱ्यांनी २२ मार्च पासुन बेमुदत उपोषण सुरु आहे.उपोषणला १६ शेतकरी बसले आहेत. आज उपोषणाचा रविवार रोजी (ता.२५ ) चौथा  दिवस असून अनेक शेतकऱ्यांची प्रकृती खालवली आहे . शनिवारी दुपारनंतर उपोषणासाठी बसलेल्या अनेक शेतकऱ्यांना सलाईन लावण्यात आली होती.रात्री आठ वाजण्याच्या नंतर अजिनाथ कांबळे (वय ७९),शंकर होळ (७२) किरण बाेरा (वय ५५) ,या तीन शेतकऱ्यांची  प्रकृती  अचानक खालवली. त्यांना शनिवारी रात्री तातडीने इंदापूर मधील उपजिल्हारुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.उपोषणकर्त्याची प्रकृती खालवल्याने इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे उपोषणाच्या ठिकाणी  तळ ठोेकून बसले होते. 

पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व  आरोग्य  समिती सभापती प्रवीण माने यांनी रात्री उशीरा भेट देवून शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्‍नासाठी अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. मात्र चोपडे शेतकरयांची मागणी ही ऐकून घेण्यासाठी तयार नव्हते. तसेच तीन दिवसामध्ये पाटबंघारे विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी उपोषण ठिकाणी फिरकला नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Web Title: Pune news farmer agitation for water in Indapur