कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी किमान पाचशे रूपये खर्च

रामदास वाडेकर
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

शासनाने शेतक-यांची कर्जमाफी करायला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना घोषित केली.कर्जमाफी साठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षाने रान उठविले,शेतक-यांच्या भावांनाच आदर करीत शासनाने ही योजना घोषित केली.विरोधकांसह सत्ताधारी पक्षाने कर्जमाफी श्रेय लाटण्यासाठी होर्डिग्ज, बॅनर लावून मोठी प्रसिद्धी मिळवली, खरी पण प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. 

टाकवे बुद्रुक : कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची ऑनलाईन अर्ज भरायला सायबर कॅफेत रांग लागत आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करायला पन्नास रूपये, शंभर रूपये फी आकराली जात आहे. क्नेक्टिविटी गेल्यावर एक अर्ज भरायला किमान अर्धा ते पाऊणतासाचा वेळ जातोय, कर्जमाफी घ्यायला दिवसभर रांगेत उभे राहवे लागत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एका अर्जासाठी किमान पाचशे रूपये खर्च येतोय. नको ही कर्जमाफी म्हणून वैताग व्यक्त केला जात आहे. 

शासनाने शेतक-यांची कर्जमाफी करायला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना घोषित केली.कर्जमाफी साठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षाने रान उठविले,शेतक-यांच्या भावांनाच आदर करीत शासनाने ही योजना घोषित केली.विरोधकांसह सत्ताधारी पक्षाने कर्जमाफी श्रेय लाटण्यासाठी होर्डिग्ज, बॅनर लावून मोठी प्रसिद्धी मिळवली, खरी पण प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. 

विहीत नमुन्यातील अर्ज दाखल करताना वैयक्तिक माहिती, आधारकार्ड क्रमांक, रजिस्टर मोबाईल क्रमांक, पॅनकार्ड, पत्नीची माहिती, उत्पन्नाची माहिती नमूद करावी लागते.आंदर मावळातील काही शेतक-यांनी आधारकार्ड नोदणी केली पण अजून कार्ड हातात आली नाहीत. कुटूंबियांच्या सर्व सदस्यांची मिळून १.५० लाखा पेक्षा कमी असणारी रक्कम मुद्दल व.व्याजासह  रक्कम माफीस पात्र आहे. पुर्नगठीत केलेल्या पिक कर्जासाठी अनूज्ञेय लाभ मिळण्यास पात्र आहे.हे लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याची ऑनलाईन अर्ज दाखल करायला गर्दी वाढत आहे.

शासनाने ग्रामपंचायतीच्या संग्रामकक्षात, बॅकेत ही सोय केल्याचे सांगितले जात आहे, मावळातील सुमारे ३० हजार शेतकऱी या योजनेचे  लाभार्थी आहे.लाभार्थ्यांची संख्या आणि ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची केंद्र यात मोठी तफावत आहे.किमान २० ते ३० मिनिटे वेळ अर्ज दाखल करायला लागतोय,त्यातच कन्टेटिव्हटी गेली तर अर्ज दाखल करता येत नाही. 

आधारकार्ड नोदणीच्या वेळी रजिस्टर केलेला मोबाईल क्रमांकावर व्हीएटी क्रमांक येतो,तो टाकल्यावरच अर्ज दाखल होऊन त्याची पोच मिळते.बराच प्रमाणात शेतक-यांनी आधारकार्ड नोदणी करताना दाखल केलेला नंबर सांगता येत नाही,थंब दिल्यावरही ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पुढे जाते,यासाठी सोबत पत्नीला आणावे लागते.

ग्रामीण भागातील खाडी ,सावळा, माळेगाव, इंगळूण, किवळे, कुसूर, डाहूली, थोरण,जांभवली, शिरदे,सोमवडी,तुंग, चावसर, मोरवेतील शेतक-यांना एक फाॅर्म भरायला किमान पाचशे रूपये खर्च येतोय.पती पत्नीचा प्रवास खर्च,चहापान आणि सायबर कॅफेतील फी याचा या खर्चात समावेश करावा लागेल. 

शेतक-यांची वाढती गर्दी पाहून एक दिवसात हा फाॅर्म भरता येत नाही.त्यासाठी किमान दोन ते पाच दिवस गेल्याचे रांगेत उभे असलेल्या शेतक-यांनी सांगितले. खेड तालुक्यातील वाडा जवळील शंकर मारूती ठोकळ या शेतक-याचा ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या रांगेत उभे असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना गांभीर्याने विचार करावा लावणारी आहे.

Web Title: Pune news farmer loan waiver in maval