पुणे जिल्ह्यातून फक्त 1 लाख 83 हजार 209 शेतकरी पात्र !

यशपाल सोनकांबळे
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 2 लाख 99 हजार, व्यावसायिक आणि खासगी बँकांचे अनुक्रमे 40 हजार असे एकूण 3 लाख 39 हजार कर्जदार शेतकरी जिल्ह्यात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने राज्यसरकारला दिली
होती. 

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभासाठी जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या 3 लाख 2 हजार 56 ऑनलाइन अर्जांपैकी केवळ 1 लाख 83 हजार 209 अर्जच पात्र ठरले असून तब्बल 1 लाख 14 हजार 846 अर्ज अपात्र ठरले आहेत, अशी माहिती सहकार विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

दरम्यान, सहकार विभागातील अधिका-यांनी पुणे जिल्ह्यातील एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज बाद झाल्याची अधिकृत आकडेवारी आली नसल्याचे सांगितले आहे. परंतु, प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी दहा ते बारा टक्के अर्ज बाद होऊ शकतात असे निदर्शनास आले होते, असे स्पष्टीकरण दिले आहे. 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतक-यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तर कर्ज परतफेड करणा-यांना पंचवीस टक्के तर, कमाल पंचवीस हजार रुपये प्रोत्साहनपर निधी अशा तीन टप्प्यांत लाभ देण्यात येणार आहे. कर्जमाफीचा लाभ मिळण्याकरिता राज्यातील शेतक-यांना अर्ज भरण्यासाठी 22 सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार पुणे जिल्ह्यातून 3 लाख 2 हजार 56 ऑनलाइन अर्ज दाखल झाले.

दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 2 लाख 99 हजार, व्यावसायिक आणि खासगी बँकांचे अनुक्रमे 40 हजार असे एकूण 3 लाख 39 हजार कर्जदार शेतकरी जिल्ह्यात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने राज्यसरकारला दिली
होती. 

दरम्यान, पुण्यात शेती असलेले परंतु, पुण्याबाहेर राज्यभरातील विविध ठिकाणी स्थायिक झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 5 हजार 435 एवढी छाननी प्रक्रियेमध्ये निष्पन्न झाली. त्यामुळे पुणे जिल्ह्यातून आलेल्या 2 लाख 98 हजार 56 अर्जांमध्ये या अर्जांची भर पडली असून जिल्ह्यातून कर्जमाफीकरिता एकूण 3 लाख 3 हजार 491 अर्ज प्राप्त झाल्याची नोंद शासन स्तरावर करण्यात आली आहे. या सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याकरिता 2 हजार 30 कोटी एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे.

चावडीवाचनामध्ये जिल्ह्यातून यादीत नाव नसणे, पती किंवा पत्नीचे नाव नसणे, निकषात बसत नाहीत अशा सामाजिक लेखापरिक्षणासाठी (सोशल ऑडिट) चावडीवाचन झालेल्या गावांपैकी जिल्ह्यातून 567 लाभायींना अपात्र ठरवावे, अशा लेखी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तर, काही शासकीय कर्मचाच्यांनी स्वतःहून चुकून
ऑनलाइन अर्ज भरल्याचे सांगत अर्ज मागे घेत असल्याचे लेखी पत्र दिल्याने त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करताना एकूण अर्जांपैकी दहा ते बारा टक्के अर्ज बाद होण्याचा अंदाज होता.

मात्र जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी अपात्र झाल्याची अधिकृत आकडेवारी अद्याप आमच्यापर्यंत पोचलेली नाही. राज्यशासनाकडून तीन टप्यांमध्ये कर्जमाफी देण्यात येणार हे. त्यामुळे नेमक्या कोणत्या टप्प्यातील आकडेवारी समोर आली आहेयाबाबत माहिती नाही, अशी माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील 1 हजार 464 गावांमध्ये कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या अर्जदारांच्या याद्यांचे जाहीर चावडीवाचन करण्यात आले आहे. चावडीवाचनामध्ये 1 हजार 241 गावांमध्ये चावडीवाचन पूर्ण झाले आहे तर, ग्रामपंचायत निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्याने 223 गावांमध्ये चावडीवाचनाची प्रक्रिया होऊ शकलेली नाही. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया संपल्यामुळे बुधवारपासून उर्वरित 223 गावांमधील चावडीवाचन हाती घेण्यात येणार आहे.

Web Title: Pune news farmer loan waiver in Pune