किटकनाशकाबाबत जागरूकता करणे गरजेचे: कृषी अधिकारी

युनूस तांबोळी
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

किटकनाशके ही अत्यंत विषारी असली तरी तिला फवारणी करणारी यंत्रणा सदोष असणे गरजेचे आहे. त्यातून फवारणी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात परवाना धारक दुकानदारांकडूनच अशी औषधे खरेदी करण्यात यावीत. कोणतीही यातून दुर्घटना घडल्यास तातडीने तालुका स्तरावर प्रतिकात्मक औषधांची उपलब्धता करून देण्याचे आदेश तालुका वैद्यकिय अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे जिल्हा परीषदेचे अद्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिले आहेत.

टाकळी हाजी : किटकनाशक फवारणी करत असताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे अपेक्षीत आहे. त्या बरोबर किटकनाशक विक्री करणाऱ्या दुकानदार कृषी पदवीका घेतलेला असावा. त्याने शेतकऱ्यांना किटकनाशकाबाबत जागरूकता करणे गरजेचे असल्याचे मत पुणे जिल्हा कृषी अधिकारी सुनील खैरनार यांनी मांडले.  

मलठण ( ता. शिरूर ) येथे शेतकऱ्यांना पिक किटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयी प्रात्यक्षिक करून दाखविताना ते बोलत होते. यावेळी शिरूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी निलेश बुघवंत उपस्थीत होते. 

खैरनार म्हणाले की, डाळींब व द्राक्ष उत्पादक शेतकरी हा शेतात सर्वात जास्त प्रमाणात पिकावर किटकनाशक फवारणी करत असतो. पुणे जिल्ह्यात जिल्हा परीषद व कृषी विभागाच्या संयुक्त उपक्रमातून किटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी या विषयी प्रशिक्षीत केले जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांचे बळी गेले. त्यामुळे पुणे जिल्ह्यात अशी कोणतीही घटना घडू नये म्हणून जिल्हा परीषद शेतकऱ्यांना पिक संरक्षण किट बाबत प्रशिक्षण देत आहे. या किट मध्ये टोपी, चष्मा, मास्क आणी अंगात घालावयाचे कपड्यांचा समावेश आहे. किटकनाशक फवारताना पुर्ण संरक्षण होणे गरजेचे आहे. किटकनाशक फवारणी झाल्यावर रिकाम डबे नष्ठ करावेत. लहान मुलांपासून अशी औषधे दूर ठेवावीत. फवारणी झाल्यावर हात स्वच्छ साबनाने धुवावेत. 

किटकनाशके ही अत्यंत विषारी असली तरी तिला फवारणी करणारी यंत्रणा सदोष असणे गरजेचे आहे. त्यातून फवारणी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात परवाना धारक दुकानदारांकडूनच अशी औषधे खरेदी करण्यात यावीत. कोणतीही यातून दुर्घटना घडल्यास तातडीने तालुका स्तरावर प्रतिकात्मक औषधांची उपलब्धता करून देण्याचे आदेश तालुका वैद्यकिय अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे जिल्हा परीषदेचे अद्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिले आहेत.

फवारणी करत असताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे अपेक्षीत आहे. गावागावात शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन कृषी विभाग शेतकऱ्यांना हे किट वापरण्याचे प्रशिक्षण देणार आहे. विक्री करणाऱ्या दुकानदारांनी देखील अशा प्रकारची जागरूकता निर्माण करणे अपेक्षीत आहे. सध्या गावागावात चार ते पाच सरंक्षण किट दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी या किटचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा परीषदेच्या कृषी सभापती सुजाता पवार यांनी केले आहे. 

Web Title: Pune news farmer pesticide