शेतकऱ्यांचे योग्य पुनर्वसन - बापट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

पुणे - भामा आसखेड धरणातून पुण्यात पाणी आणण्यासाठी विरोध असणाऱ्यांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी दिली. 

पुणे - भामा आसखेड धरणातून पुण्यात पाणी आणण्यासाठी विरोध असणाऱ्यांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी दिली. 

भामा आसखेड धरणातून पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला पाणी आणण्यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा झाली. त्यातून मार्ग काढण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. या प्रकल्पातील शेतकऱ्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार सुरेश गोरे यांना प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करण्यास सांगितले. भामा आसखेडमध्ये एकूण १४०४ प्रकल्पग्रस्त आहेत. यातील ३८८ शेतकऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने पात्र ठरविले आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना रोख स्वरूपात मोबदला द्यायचा झाल्यास किती रक्कम द्यावी लागेल, या विषयीचा आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी दिली.

Web Title: pune news farmer rehabilitation girish bapat