अनावश्‍यक खर्च टाळून कलावंतास आर्थिक मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

पुणे - सजावट, ढोल-ताशा पथक, देखावा, मिरवणूक आदींसाठी लागणाऱ्या खर्चात कपात करून लोककला जपणाऱ्या गरजू कलावंताला आर्थिक मदतीचा हात देण्याचा आगळावेगळा उपक्रम कोथरूड येथील आकार मित्र मंडळाने राबविला.

पुणे - सजावट, ढोल-ताशा पथक, देखावा, मिरवणूक आदींसाठी लागणाऱ्या खर्चात कपात करून लोककला जपणाऱ्या गरजू कलावंताला आर्थिक मदतीचा हात देण्याचा आगळावेगळा उपक्रम कोथरूड येथील आकार मित्र मंडळाने राबविला.

गणेशोत्सवात कानावर पडणाऱ्या टिंब टिंब टिंबाली.. या गाण्याचे गीतकार उत्तम कांबळे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मंडळाने त्यांच्याकरिता मदतीचा हात पुढे करीत लोककलेला जपण्याचा प्रयत्न केला आहे.

आमदार मेधा कुलकर्णी, पोलिस सह आयुक्त रवींद्र कदम, राजकीय विश्‍लेषक अभिनंदन थोरात, अलंकार ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेखा साळुंके, मंडळाचे उत्सवप्रमुख सचिन फोलाने, गायक प्रदीप कांबळे, प्रकाश बारड, शशिकांत पोहरकर, राकेश बांदिवडेकर, महेंद्र कडू, बाळकृष्ण निढाळकर, हेमंत धनवे, अजित सोमवंशी, वैभव कोठुळे, संतोष वरक आदी उपस्थित होते. या प्रसंगी कांबळे यांना एकवीस हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

कुलकर्णी म्हणाल्या, 'उत्तम कांबळे हे नावाजलेले लोककलाकार असून, सध्या ते आर्थिक परिस्थितीचा सामना करीत आहेत. यामुळे, त्यांना मुख्यमंत्री निधीतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.''

Web Title: pune news financial help to artists