पुणे : औंधरस्ता येथे आगीमुळे संसार उघड्यावर

बाबा तारे
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

रात्री सव्वा दहाच्या सुमारास लागलेल्या या आगीत घरातील सर्व सामान, धान्य, कपडे, महत्त्वाचे कागदपत्रे जळून भस्मसात झाली असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. येथेच राहत असलेल्या रंजना काळे नावाच्या महिलेनेच घरात आग लावल्याने तिच्यामुळेच ही आग सर्वत्र भडकल्याचे प्रत्यक्षदर्शी व ज्यांची घरे जळाली आहेत.

औंध : औंधरस्ता येथील पडळवस्ती येथे शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत सतरा घरे जळून खाक झाल्याने सर्वच कुटूंबे उघड्यावर पडली आहेत.

रात्री सव्वा दहाच्या सुमारास लागलेल्या या आगीत घरातील सर्व सामान, धान्य, कपडे, महत्त्वाचे कागदपत्रे जळून भस्मसात झाली असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. येथेच राहत असलेल्या रंजना काळे नावाच्या महिलेनेच घरात आग लावल्याने तिच्यामुळेच ही आग सर्वत्र भडकल्याचे प्रत्यक्षदर्शी व ज्यांची घरे जळाली आहेत. त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यात संजय कांबळे यांचे मंडप व डेकोरेशनचे गोदाम आहे हे जळाल्याने जवळपास पंधरा लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. तर इतरांचे घरगुती सामान जळाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे हे सर्व कुटूंब ही हातावर पोट असणारी गरीब कुटूंब आहेत. या वस्तीत मोठ्या प्रमाणात दाटीवाटीने घरे उभारली असल्याने येथे रूग्णवाहिका, अग्निशमन दलाची गाडी किंवा तत्सम मदतीसाठी सहज पोहचता येत नाही. याकारणामुळे ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत सर्व घरे आगीत भस्मसात झाली होती. तर नागरिकांनी अग्निशमन दलाची गाडी उशिरा आल्यामुळे आग आटोक्यात आणण्यास उशीर झाल्याचा आरोप केला. तसेच आग एवढी लवकर पेटत गेली की कुणालाच ही आग आटोक्यात आणणे शक्य झाली नाही. तोपर्यंत डोळ्यासमोर स्वतःची घरे जळताना पहावी लागल्याचे महिलांनी सांगितले.

यावेळी विशेष बाब म्हणजे विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत विजपुरवठा खंडित केल्याने बराच मोठा अनर्थ टळल्याचेही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या दुर्घटनेत संजय कांबळे, वंदना यादव,रामभाऊ अडागळे, सुरम्मा भोई, विलास केदारी, मंगल अशोक चव्हाण, श्रीकांत गायकवाड, राजकुमार आनंदा भालेराव, जयवंत साठे, रंजना काळे, नंदा माने,सोमनाथ जाधव, कलावती दुर्वेल्लू, रविंद्र कांबळे, जितेंद्र कांबळे,रेखा गायकवाड, शोभा जाधव, शशिकला पाटोळे, अनिल मोहिते इत्यादीची घरे जळाली .

रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही आग शेजारी राहणाऱ्या रंजना काळे हिच्या घरात जाळ केल्याने लागली.ही आग काही कळायच्या आत सर्वत्र पसरली व विझवणे अवघड झाले.तसेच अचानक लागलेल्या आगीने सर्व कुटूंबीय आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पडले.आर्थिक नुकसानासह घरे नष्ट झाल्याने या कुटूंबांचा रहाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एवढी मोठी दुर्घटना घडूनही अजूनही सरकारी यंत्रणेकडून याची दखल घेतली नाही. दुरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कुणाशीही  संपर्क होऊ शकला नाही. तसेच पाहणी करण्यासाठी कोणीही फिरकले नाही. त्यामुळे या कुटूंबाची दखल सरकारी यंत्रणेकडून त्वरित घ्यावी अशी आमची मागणी आहे.
- संजय कांबळे, दुर्घटनाग्रस्त रहिवाशी.

 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Pune news fire in aundh