पाच टक्के "जीएसटी'ची अंमलबजावणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

पुणे - हॉटेलच्या बिलावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत; मात्र बुधवारी पहिल्याच दिवशी शहरातील काही हॉटेल्स व्यावसायिकांनी त्यांच्या कॉम्प्युटर सिस्टिममध्ये बदल केला नव्हता. काही व्यावसायिकांनी बदल केल्यामुळे त्यांना पाच टक्केच जीएसटी द्यावा लागला. विशेष म्हणजे पाच टक्के जीएसटी आकारल्याचे हॉटेल व्यावसायिकांकडून रीतसर बिलही देण्यात येत होते. 

राज्यातील सर्व हॉटेल्समधील खाद्य पदार्थांच्या बिलांवर बुधवारपासून सरसकट पाच टक्के जीएसटी आकारण्यात यावा, जे हॉटेल व्यावसायिक ग्राहकांकडून जादा पैसे आकारतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे आदेशच सरकारने दिले होते; परंतु शहरातील काही व्यावसायिकांकडे विचारणा केली असता ते म्हणाले, आम्ही जीएसटी न आकारता बिल दिले आहे. कारण, आमच्या कॉम्प्युटर सिस्टिममध्ये अजून पाच टक्के जीएसटीबद्दलची माहिती अद्ययावत केलेली नाही. गुरुवार (ता. 16) पर्यंत आम्ही ही माहिती अद्ययावत करू. त्यानंतर बिल देताना त्यावर पाच टक्के जीएसटी आकारल्याची माहितीही ग्राहकांना होईल.'' 

दरम्यान, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, ""पाच टक्के जीएसटीबाबतचे आदेश मंगळवारी रात्री उशिरा मिळाले. या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून, बिलावरही पाच टक्के कर आकारल्याची माहिती देण्याच्या सूचना हॉटेल व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत. बिलामध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी मिळून (केंद्र व राज्य सरकारचा सेवा कर) प्रत्येकी अडीच टक्के म्हणजे एकूण पाच टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे.'' 

एका हॉटेलचे व्यवस्थापक रमेश पुजारी म्हणाले, ""अगोदर बारा टक्के जीएसटी होता. त्या वेळेस बिल देताना ग्राहक तीव्र नाराजी व्यक्‍त करत होते. आता पाच टक्केच द्यावे लागणार असल्याने ग्राहकही समाधानी आहेत.'' 

ग्राहक मधुसूदन चेरेवार म्हणाले, ""बिलावर कमीत कमी जीएसटी आकारण्यात येत असल्याने ग्राहकांच्या दृष्टीने हा निर्णय दिलासा देणारा आहे.'' 

Web Title: pune news Five percent "GST" implementation