घडी घालता येणारा टीव्ही 

शनिवार, 13 जानेवारी 2018

श्‍वेत-धवल टीव्हीपासून रंगीत टीव्हीपर्यंतचा प्रवास करण्यासाठी काही दशकांचा कालावधी लागला. त्यानंतर मात्र काही वर्षांच्या अंतरावरच रंगीत टीव्हीचा आकार बदलत गेला. फ्लॅट स्क्रीन, एलसीडी, एलईडी टीव्हीनंतर आता एक नवीन ट्रेंड येऊ घातला आहे. घरामध्ये "टीव्ही'साठी लागणारी जागा कमीत कमी लागेल, यासाठी आता प्रयत्न होऊ लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी पारदर्शक टीव्हीचे सादरीकरण करण्यात आले, तर आता घडी घालता येईल, अशा टीव्हीचे सादरीकरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले आहे. 

टीव्हीचा आकार हा सर्वसाधारणपणे घराच्या खोलीच्या आकाराप्रमाणे ठरविला जातो. स्क्रीन किती इंचीचा असावा, यावर खरंतर संशोधनच केले जाते. विशेषत- काही खास प्रकारचे चित्रपट पाहण्यासाठी कोणत्या प्रकारचा टीव्ही चांगला आहे, यावर खूप विचार केला जातो; पण आता फक्त बातम्यांचे किंवा जाहिरातीचे स्क्रोल बघण्यासाठी म्हणा किंवा ऍस्पेक्‍ट रेशियो बदलता येईल, अशी टीव्ही स्क्रीन मिळाली तर प्रेक्षकांना चांगला अनुभव मिळेल, यावर टीव्ही उत्पादक कंपन्यांनी काम केले आहे. आवश्‍यकतेनुसार गुंडाळून ठेवता येईल, अशी स्क्रीन असलेला टीव्ही बनविण्यात या कंपन्यांना यश आले आहे. 

स्क्रीनला तीन टप्प्यांत उघडता येईल, अशा पद्धतीने त्याचे उत्पादन केले आहे. स्क्रीनचा फक्त एक चतुर्थांश भाग उघडेल हा पहिला टप्पा, तर 21-9 ऍस्पेक्‍ट रेशियोमध्ये खास चित्रपट पाहण्यासाठी उघडता येणारा दुसरा टप्पा आणि पारंपरिक पद्धतीने दृश्‍य पाहण्यासाठी पूर्णपणे उघडणारा तिसरा टप्पा, अशा पद्धतीने हे उत्पादन केले आहे. कागदाएवढा पातळ, 65 इंची ऑरगॅनिक एलईडी स्क्रीन आणि फोर के रेसोल्यूशन, अशी या स्क्रीनची वैशिष्ट्ये आहेत. गुंडाळून ठेवता येणारे असल्यामुळे साहजिकच घरात हॉलमध्ये "टीव्ही'साठी म्हणून ठेवलेली जागासुद्धा आता वापरता येणार आहे. तसेच एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये टीव्ही नेणे सोपे होणार आहे. खरं म्हणजे आता प्रवासातही टीव्ही सोबत घेऊन जाता येईल, असे म्हटले जात आहे. विशेषत- अति वेगवान इंटरनेट स्पीड असलेले डोंगल आणि गुंडाळून ठेवता येईल, असा टीव्ही जर कारमध्ये ठेवता आले तर आपल्याला ग्राहक म्हणून आणखी काय पाहिजे? 

Web Title: pune news flod TV techno