राज्यातील शाळांत शुक्रवारी फुटबॉलचा सामना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

पुणे - देशात ६ ते २८ ऑक्‍टोबर दरम्यान फिफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धा होणार आहे. त्यानिमित्ताने येत्या शुक्रवारी (ता. १५) महाराष्ट्र फुटबॉलमय होणार आहे. या दिवशी राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉलचा सामना घेतला जाणार आहे.

क्रीडा व मिशन महासंघातर्फे आयोजित या सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील दहा लाख विद्यार्थी आणि प्रत्येक शाळेतील पन्नास खेळाडू विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

‘मिशन वन मिलियन’ उपक्रमांतर्गत ही स्पर्धा होत आहे. यासंदर्भात पुण्यात झालेल्या क्रीडा शिक्षकांच्या सहविचार नियोजन सभेत ही माहिती देण्यात आली. पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयातील मीनाक्षी राऊत, नगर जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, राज्य संघटनेचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अरुण चंद्रे, मकरंद कोल्हटकर, प्रा. संजय साठे, काचेश भागवत, रावसाहेब बाबर, फुटबॉल संघटनेचे गोपीचंद, कुलदीप देशमुख, सोलापूर क्रीडा व शारीरिक शिक्षण संघाचे संतोष खेंडे, पुणे विभागीय महासंघाचे सचिव विश्वनाथ पाटोळे, कमलाकर डोके उपस्थित होते.

पुणे विभागांतर्गत जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांना १५ सप्टेंबरला खेळणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांची नावे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना कळवायचे आहेत. त्यासाठी ऑनलाइन पोर्टलवर नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध केली आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

८० टक्‍के विद्यार्थ्यांचा सहभाग हवा
महाराष्ट्र फुटबॉलमय होण्यासाठी पुणे विभागातील नगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सहभाग नोंदवायचा आहे. या दिवशी शाळा तसेच मैदाने उपलब्ध असतील, तिथे फुटबॉल सामन्यांचे आयोजन करायचे आहे. प्रत्येक शाळेतील ८० टक्के विद्यार्थी यात सहभागी व्हावेत, असे मत या सभेत व्यक्त करण्यात आले.

Web Title: pune news football school