दीड लाखाचे अवैध विदेशी मद्य जप्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

पुणे - महामार्गाच्या दुतर्फा पाचशे मीटर अंतरावर मद्यविक्री करण्यास बंदी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून काळेवाडी हद्दीत सुमारे दीड लाख रुपयाचा अवैध विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. 

या कारवाईमध्ये शशी जमुनादास हिराणी (वय 35, रा. उल्हासनगर, मुंबई) याला अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात एक लाख 40 हजार 640 रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. 

केंद्र शासित प्रदेशात विक्रीची परवानगी असलेल्या विदेशी मद्याची 17 बॉक्‍स जप्त केले. त्यात 750 मिली क्षमतेच्या 204 विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक युनिट एकने केली. उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त अर्जुन ओव्हळ, अधीक्षक मोहन वर्दे, उपअधीक्षक सुनील फुलपगार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तानाजी शिंदे, एम.व्ही. कदम, एस. वाय. दरेकर, एस. एस. कांबळे, एन. यू. जाधव यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. 

Web Title: pune news Foreign liquor seized