जमीन व्यवहारात फसवणूक सूत्रधाराला पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

पुणे - जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात हडपसर पोलिसांनी सूत्रधाराला अटक केली. न्यायालयाने त्याची 17 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. या गुन्ह्यातील महिला आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. 

या प्रकरणी अन्वर गफूर शेख यांची उरुळी देवाची येथील जमीन खरेदीत फसवणूक झाली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वी अरबाज जिंदेशा शेख (रा. सातवनगर) याला अटक केली होती. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार राज गुलाब शेख (वय 27, रा. इंदिरानगर, हांडेवाडी रस्ता) याला पोलिसांनी अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. त्याच्या एका महिला साथीदाराचा शोध सुरू आहे. आरोपींनी या महिलेला दुसऱ्या महिलेच्या जागी उभे करून दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट दस्त तयार केले. आरोपी शेख हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असून, त्याची हांडेवाडी परिसरात दहशत असल्याची माहिती सहायक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयात दिली. आरोपीविरुद्ध कोंढवा, हडपसर, वानवडी, या पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: pune news fraud dealer in land deal