टिफीन बॉक्‍सला फळा-फुलांचा साज!

बुधवार पेठ - टिफीन  बॉक्स व वॉटर बॉटल खरेदी करताना पालक.
बुधवार पेठ - टिफीन बॉक्स व वॉटर बॉटल खरेदी करताना पालक.

पुणे - प्राणी, पक्षी, कार्टून्स, फळे, फुले अशा विविध आकारांमध्ये टिफीन बॉक्‍स व वॉटर बॉटल बाजारात उपलब्ध आहेत. नीळा, गुलाबी, लाल, पिवळा, हिरवा अशा रंगछटाही त्यात आहेत. टिकाऊपणाबरोबरच दिखाऊपणावरही यात भर देण्यात आलेला आहे. 

टिफीनमध्ये प्लॅस्टिक आणि मेटल असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. टिफीन बॉक्‍स घेताना मुख्यतः टिकाऊपणा व कप्प्यांचा विचार केला जातो. टिकाऊपणासाठी अजूनही बहुतांश पालक मेटलला पसंती देताना दिसतात. आता पूर्वीसारखे साचेबद्ध डबे मिळत नसून, स्टीलच्या डब्यांमध्येही नावीन्य आले आहे. 

संपूर्ण स्टील, स्टील आणि प्लॅस्टिक, स्टील आणि काच अशा कॉम्बिनेशनमध्ये डबे मिळतात. या डब्यांमध्ये पूर्वीपेक्षा विविध आकार असले, तरी मेटल असल्याने गोल, चौकोनी, लंबगोल, आयताकृती अशा ठराविकच आकारात हे टिफीन बॉक्‍स उपलब्ध आहेत. साधारण १५० ते ५०० रुपयांपर्यंत स्टीलचे टिफीन बॉक्‍स मिळतात. दोन कप्प्यांचे, तीन कप्प्यांचे टिफीन बॉक्‍स असल्यास किंमत वाढते. 

स्टीलचे टिकाऊ टिफीन बॉक्‍स 
स्टीलच्या टिफीनमध्ये प्लॅस्टिकचे झाकण असलेल्या टिफीनला आता खूप मागणी आहे. हे झाकण घट्ट बसते व आत कोणता पदार्थ आहे, हे झाकण न उघडता कळते म्हणून या टिफीनची निवड केली जाते. स्टीलचे टिफीन एकदा घेतले, की अनेक वर्षे टिकतात व स्वच्छ करायलाही सोपे असतात, असे पालकांचे म्हणणे आहे. दुकानांमध्ये आता टिफीन, वॉटर बॅग व कंपास बॉक्‍स अशा तीन वस्तूंचा सेटही विकत मिळतो. याची किंमत तुलनेने स्वस्त असते. यात आकर्षक रंगही मिळतात. 

बाजारातील दरवर्षीच्या ट्रेंडनुसार टिफीन बॉक्‍स व वॉटर बॉटलवरील डिझाइन्स व त्यांचे रंग ठरवले जातात. यात पुस्तकांमधील कार्टून्स, टीव्हीवरील गेम शो यांचा खूप मोठा सहभाग असतो. मुलांच्या आवडीचा विचार करून शालेय वस्तू तयार केल्या जातात. यंदा चित्रपटाच्या छायाचित्र असलेल्या टिफीन व वॉटर बॉटला मागणी जास्त आहे.
- सचिन गायकवाड, विक्रेते
 

स्पोर्ट्‌स वॉटर बॅगला पसंती 
प्लॅस्टिकच्या पारदर्शी वॉटर बॅगवर कार्टून्सची चित्रे आहेत. मेटलमध्येही वॉटर बॅग मिळतात; शिवाय स्पोर्टस वॉटर बॅग्जना अधिक मागणी आहे. स्पोर्टस वॉटर बॅगमध्ये लाल, नीळा, चॉकलेटी असे रंग आहेत. खेळाडूंची चित्रे, अभिनेत्यांची छायाचित्रे असलेल्या वॉटर बॅगच्या विविध व्हरायटी उपलब्ध आहेत. बॉटल विथ कव्हर अशी नवी रेंज यात आहे. ही कव्हर्स आकर्षक रंगांमध्ये आहेत. मुलींसाठीच्या कव्हर्सना मणी, मोत्यांचे डिझाईन, तर मुलांसाठीचे कव्हर्स गडद रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com