शहराच्या हद्दीबाहेरसुद्धा दर्जेदारच इंधन - रुकारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

पुणे - शहराच्या हद्दीबाहेर चांगल्या दर्जाचे इंधन मिळत असल्याची माहिती पेट्रोल डिलर्स असोसिएशन, पुणेचे उपाध्यक्ष सागर रुकारी यांनी दिली. देशातील सर्व रिफायनरीजमध्ये बीएस-४ दर्जाच्या इंधनाची निर्मिती होत असल्याचेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. 

स्थानिक संस्था कर रद्द झाल्यापासून शहराच्या आत आणि बाहेर इंधनाच्या किमती समान आहेत, असेही त्यांनी नमूद केले आहे. एक वर्षापासून बीएस-४ इंधनाचा पुरवठा सर्व पंपांना केला जात असल्याची माहिती ऑइल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, काही ऑइल कंपन्याकडून काही भागांमध्ये बीएस-३ इंधनाची विक्री केली जाते, अशी माहिती असोसिएशनचे पुण्याचे अध्यक्ष सुमीत धुमाळ यांनी दिली.

Web Title: pune news fuel sagar rukari