श्री क्षेत्र लेण्याद्रीला पहाटे पासून भाविकांची गर्दी

lenyadri-temple
lenyadri-temple

जुन्नर - अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज (शुक्रवार) भाद्रपद गणेश चतुर्थीनिमित्त भाविकांनी पहाटे पासून गर्दी केली होती. तसेच देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, अशी माहिती अध्यक्ष शंकरराव ताम्हाणे व व्यवस्थापक निलेश सरजिने यांनी दिली.

आज सकाळी देवस्थानचे वतीने देवस्थानचे विश्वस्त,पुजारी,  कर्मचारी व भाविक यांच्या उपस्थितीत श्रीना महाअभिषेक करण्यात आला. यानंतर मंदिरात नामदेव महाराज वाळके यांचे गणेश जन्माचे कीर्तन झाले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष शंकर ताम्हाणे, सेक्रेटरी गोविंद मेहेर खजिनदार सदाशिव ताम्हाणे विश्वस्त काशिनाथ लोखंडे,जयवंत डोके, प्रभाकर जाधव,जितेंद्र बिडवई तसेच कर्मचारी व भाविक उपस्थित होते.

आज दिवसभर पुणे, नगर, मुंबई, ठाणे,नाशिक तसेच जुन्नर परिसरातून श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविक येत होते. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी विविध सेवा पुरविण्यात आल्या. कीर्तनानंतर देवस्थानचे वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिरात फुलाची आकर्षक सजावट करण्यात  आली होतीे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com