आळंदीः इंद्रायणी नदीत गणपती विसर्जन करताना युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

आळंदी (पुणे): मरकळ येथील इंद्रायणी नदीत गणपती विसर्जन करताना अठरा वर्षीय तरूणाचा पाण्यात बूडून दर्दैवी मृत्यू झाला. आकाश सुनिल वर्पे (रा. मरकळ, ता. खेड)असे तरूणाचे नाव आहे.

आळंदी (पुणे): मरकळ येथील इंद्रायणी नदीत गणपती विसर्जन करताना अठरा वर्षीय तरूणाचा पाण्यात बूडून दर्दैवी मृत्यू झाला. आकाश सुनिल वर्पे (रा. मरकळ, ता. खेड)असे तरूणाचे नाव आहे.

आळंदी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरिक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले की, मंगळवारी (ता. 5) विसर्जनाच्या दिवशी मरकळ येथील इंद्रायणी नदीत आकाश वर्पे घरचा गणपती विसर्जन करण्यासाठी गेला होता. येथील नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तरूण बूडाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक साठ ते सत्तर तरूणांच्या सहाय्याने पाण्यात बुडालेल्या आकाशचा शोध घेतला. मात्र, मृतदेह काही आढळला नाही. अखेर आपत्ती व्यवस्थापन म्हणून एनडीआरफचे पथक बोलावून मृतदेह शोधण्याचे काम सुरू करण्यात आले. रात्री सात वाजेपर्यंत मृतदेह सापडला नाही. आणि एनडीआरएफचे पथकही पुन्हा माघारी गेले. दरम्यान, आज सकाळी बुडालेल्या ठिकाणापासून चारशे फूट पुढे आकाशचा मृतदेह मिळाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह पाण्यावर तरंगून दिसून आला. मृतदेहाचा पंचनामा आणि शवविच्छेदन करून मृतदेह कुटूंबियाच्या ताब्यात दिला.  

दरम्यान, आकाशला पोहता येत नव्हते. मात्र, घरचा गणपती असल्याने तो पाण्यात उतरला. आकाश मरकळ येथील खासगी कंपनीत कामाला जात होता. आकाश वर्पे कुटूंबात एकटाच मुलगा होता. यामुळे गावातील लोक हळहळ व्यक्त करत होते.

मरकळ येथील जूनी स्मशानभूमी ते इंद्रायणीवरिल पुलालगत धरणापर्यंत वाळू उपसा करण्यासाठी मरकळ ग्रामस्थांनी परवानगी दिली नाही. मात्र, तुळापूर हद्दीत परवानगी दिला गेलेला ठेकदार मरकळ हद्दीतही बेकायदा वाळू उपसा करत आहे. यामुळे स्मशानभूमीजवळ नदीपात्रात वीस ते तीस फूट खोलवर अनाधिकृत वाळू उपसा झाला आहे. महसूल विभागाने ठेकेदारावर कारवाई करणे अपेक्षित आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत 
मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ 
बीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू
नाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप
बाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर
रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी
माहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'? 
'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले 
नागरिक बनले पोलिस अधिकारी

Web Title: pune news ganesh visarjan youth dead indrayani river in aalandi