नोटाबंदी, कर्जमाफीवरील देखावे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

पुणे - कीचकवध, समुद्रमंथन, शिवराज्याभिषेक आदी पौराणिक देखावे पाहायला मिळणे, हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य होते. बदलत्या काळानुसार प्रबोधनात्मक देखाव्यांनाही गणेश मंडळे पसंती दर्शवू लागले आहेत. यंदाच्या उत्सवात जिवंत देखाव्यासोबतच नोटाबंदी, कर्जमाफी, अमीर खानचे पाणी फाउंडेशन, हुंडाबळी, स्त्री-भ्रूणहत्या, अंधश्रद्धा, सर्जिकल स्ट्राइक आदी विषयांवरील देखावे पाहायला मिळणार आहेत.

गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर आला आहे. चालू घडामोडींवर आधारित नवनवे देखावे साकारण्यात मूर्तिकार दंग झालेले दिसत आहेत. शहरात सामाजिक विषयांवर, तर ग्रामीण भागात पौराणिक देखाव्यांना अधिक पसंती असल्याचे काही मूर्तिकार आवर्जून सांगतात. वास्तविक मागील तीन महिन्यांपासूनच मूर्तिकार या कामात व्यग्र आहेत.

मूर्तिकार सतीश तारू म्हणाले, ‘‘शेतकरी आत्महत्या, नोटाबंदी हे सध्याचे सामाजिक प्रश्‍न प्रामुख्याने चर्चेत आहेत. त्याविषयावर प्रबोधन व्हावे, या उद्देशाने मी स्वतःच या विषयांवरील मूर्ती घडविण्याचा निर्णय घेतला.’’ देखाव्यांच्या संकल्पनेनुसार काही मंडळे पाच, तर काही मंडळे दहा मूर्तींची ऑर्डर देतात. या सर्व मूर्ती फायबरच्या असल्याने हाताळायला हलक्‍या असतात. ग्रामीण भागात अजूनही पौराणिक देखाव्यांना अधिक पसंती मिळते. त्यामुळे पंढरीची वारी, कुंभकर्ण, सिंदूरासुर, होलिका यांसारख्या विविध मूर्ती घडविल्या आहेत. माझ्या सोबत माझी पत्नी विजया, मुलगा प्रभाकर आणि मामा विजय चक्के हे देखील मला सहकार्य करतात, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: pune news ganeshotsav

टॅग्स