गरबा दांडिया शिकण्याची संधी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

पुणे - नवरात्रीमध्ये ढोलाच्या तालावर, संगीताच्या लयीत गरबा नृत्यात हरवून जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी "सकाळ मधुरांगण' व "सेंट्रल मॉल'ने तीन दिवसांच्या "मधुरांगण गरबा दांडिया प्रशिक्षण कार्यशाळा' आयोजित केल्या आहेत. यातील पहिली कार्यशाळा बुधवारपासून (ता. 13) पिंपरीतील फिनोलेक्‍स चौकातील की हॉटेलशेजारी; तर दुसरी कार्यशाळा कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय परिसरातल्या सेंट्रल मॉल येथे गुरुवारपासून (ता. 14) होणार आहेत. "सकाळ मधुरांगण' सदस्यांबरोबरच "सकाळ'च्या वाचकांनाही या कार्यशाळेत प्रवेश घेता येईल. सिटी वन मॉल या कार्यशाळांसाठी प्रायोजक आहे. 

वीस वर्षांहून अधिक काळापासून दांडिया गरबाचे प्रशिक्षण देत असलेल्या "रंजूज वैष्णवी'च्या संचालिका रंजू ओसवाल, अंकित शहा व त्यांचे सहकारी बेसिक स्टेप, तीन टाळी गरबा, दोडीयू स्टाइल, पोपटीयू, हीप हॉप, घुमर स्टाइल, फ्युजन गरबा सोप्या पद्धतीने शिकवणार आहेत. "रंजूज वैष्णवी ग्रुप'ने अनेक नामांकित स्पर्धांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. 

"सकाळ मधुरांगण' सदस्यांसाठी हे प्रशिक्षण विनामूल्य आहे; तर सदस्येतरांसाठी 1 हजार रुपये शुल्क आहे. पिंपरीत दांडिया कार्यशाळा दोन बॅचेसमध्ये होणार आहे. पहिली दुपारी 3 वाजता; तर दुसरी सायंकाळी 5 वाजता असेल. पुण्यात तीन बॅच असून, पहिली दुपारी 3 वाजता; तर दुसरी सायंकाळी 5 वाजता, तिसरी- सायंकाळी 7 वाजता होईल. सदस्यांचे कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींना या कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे. कार्यशाळेत दांडिया विक्रीस उपलब्ध आहेत. कार्यशाळेसाठी नवीन सदस्यत्वाचे ओळखपत्र छायाचित्रासह आणणे बंधनकारक आहे. 

नावनोंदणीसाठी संपर्क 9075011142 किंवा 8378994076 (सकाळी 11च्या पुढे) दोन्ही कार्यशाळांच्या ठिकाणी मधुरांगणची सभासद नोंदणी करता येईल. 

दांडिया स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे 
"सकाळ मधुरांगण आणि सेंट्रल मॉल'च्या वतीने होणाऱ्या दांडिया स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. सेंट्रल मॉल हे बक्षीस प्रायोजक आहेत. 

Web Title: pune news Garba Dandiya madhurangan