गोसावी वस्तीतील मैदानात कचरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

कर्वेनगर - गोसावी वस्ती येथील मैदानात कचऱ्याचे ढीग साठले आहेत. वाऱ्यामुळे हा कचरा इतस्तः पसरून परिसराला कचरा डेपोचे स्वरूप आले आहे. पावसाळ्यात वस्तीसह परिसरात रोगराईचा धोका असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

गोसावी वस्तीनजीकच्या मैदानातील कचरा त्वरित उचलावा; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसंग्राम शहर युवक आघाडीचे अध्यक्ष नितीन ननावरे यांनी दिला आहे. 

सोसायट्यांतील कचरा गोळा करून कचरावेचक तो गोसावी वस्तीजवळील मैदानात आणून टाकतात. येथील अंदाजे दोन-अडीच एकर मैदानात हा कचरा आहे. या ठिकाणी कबुतरे, उंदीर आणि अन्य कीटकांचा वावर 
आहे. नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. 

ननावरे म्हणाले, ‘‘या परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर त्याचे घातक परिणाम होत आहेत. त्याला कोण जबाबदार राहणार आहे? कचरा या ठिकाणी न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावावी.’’

‘‘ही जागा राज्य सरकारची असून, या ठिकाणी कचरा टाकता येऊ नये, यासाठी ही जागा बंदिस्त करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात येणार आहे,’’ असे नगरसेवक दीपक पोटे यांनी सांगितले.

वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले, ‘‘कर्वेनगर आणि वारजे परिसरातील गोळा केलेला कचरा कचरावेचक भुजबळ बंगल्यामागील मैदानात आणून टाकतात. या ठिकाणी तो एकत्र करतात. याबाबत संबंधित २० कचरावेचकांना नोटीस बजावली आहे. आरोग्य विभागातर्फे सतत येथील कचरा उचलून नेण्यात येतो.’’

Web Title: pune news garbage on gosavi vasti