धायरीत कचरा प्रश्न सोडविण्यासाठी घंटागाड्या देऊ- तापकीर

राजेंद्रकृष्ण कापसे
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

सिंहगड रोड परिसरातील वडगाव धायरी प्रभाग क्रमांक 33 मधील राजयोग व मधूकोश धर्मावतनगर येथील पथदिव्यांचा कामांचा शुभारंभ खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते झाले.

खडकवासला : "वडगाव धायरी परिसरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी या भागात दोन घंटा देण्याचे जाहीर आश्वासन आमदार भीमराव तापकीर यांनी दिले आहे."

सिंहगड रोड परिसरातील वडगाव धायरी प्रभाग क्रमांक 33 मधील राजयोग व मधूकोश धर्मावतनगर येथील पथदिव्यांचा कामांचा शुभारंभ खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते झाले. हे काम पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य नगरसेवक हरिदास चरवड नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेविका नीता दांगट, राजश्री नवले यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात येत आहे.

कचरा प्रकल्पातील अडचणी आणि दिवाळीच्या सुट्ट्यामुळे कचरा या परिसरात साठला होता. नागरीकरण वाढत असल्याने या परिसरात कचऱ्यांचे ढीग साठले होते. नगरसेवकांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने कचऱ्याचे ढीग हलविले होते. या भागातील कचरा समस्या सोडविण्यासाठी फक्त टीका न करता. ती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न म्हणून या परिसराला दोन घंटागाडी आमदार निधीतून देणार असल्याचे तापकीर यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news garbage issue tapkir assure ghant gadi in dhayari