देशाच्‍या प्रगतीसाठी दुवा मागावी - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

पुणे - रमजानच्या पवित्र महिन्यात मागितलेली दुवा कबूल होत असल्याने देशाच्या प्रगतीसाठी दुवा मागावी, अशी भावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील उपवासाच्या निमित्ताने बापट यांच्याकडून सर्वधर्मीय ‘रोजा इफ्तार’चे आयोजन करण्यात आले होते. 

आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे, ‘सीआयडी’चे डीआयजी सुनील रामानंद, मौलाना निजामुद्दीन, मौलाना मुफ्ती शाहिद, मौलाना अक्रम मदारी, शिक्षणतज्ज्ञ पी. ए. इनामदार, निवृत्त पोलिस अधिकारी अशोक धिवरे, शिवसेनेचे अजय भोसले, माजी नगरसेवक रशीद शेख, उद्योजक विठ्ठल मणियार, समाजसेवक दत्ता गायकवाड, कलाकार अन्वर कुरेशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात आयसीएसईच्या बोर्डात बारावीला ९३ टक्के गुण मिळवणाऱ्या फरदिन खान; तसेच दहावीला ९१ टक्के गुण मिळवणाऱ्या अलिना शेख यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. फर्दीन हा मूळचा काश्‍मीरचा असून, शिक्षणासाठी तो पुण्यात आला आहे.

Web Title: pune news girish bapat