बापट यांचे बनावट फेसबुक प्रोफाइल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

पुणे - पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाइल तयार करून महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने ऋतुराज सावकार नलावडे (वय ३०, रा. धोलवड, जि. पुणे) याला अटक केली आहे. शेती आणि पत्रकारितेचा त्याचा व्यवसाय आहे.

फेसबुक या सोशल मीडियावर ‘नामदार गिरीश बापट’ या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले. त्यावर बापट यांचे छायाचित्र वापरण्यात आले होते. तसेच या फेसबुक प्रोफाइलवर काही महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रेही टाकल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी बापट यांचे माध्यम सल्लागार यांनी सायबर गुन्हे शाखेत दिलेल्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

Web Title: pune news girish bapat Fake facebook profiles