पोलिसांशी दोस्ती आणि दुश्‍मनीही - बापट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

पुणे - ""मोर्चा वगैरे अडविणे पोलिसांचे काम नाही. पोलिस हे संरक्षणासाठी आहेत, आंदोलकांना मारण्यासाठी नाहीत. माझ्या चाळीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनात मी पोलिसांतला माणूस अनेक वेळा पाहिला आहे. पोलिसांशी माझी "दोस्ती'पण आहे आणि "दुश्‍मनी'सुद्धा; पण "दुश्‍मनी' वैयक्तिक नाही तर वैचारिक आहे,'' असा मनमोकळा संवाद पालकमंत्री गिरीश बापट यांनी पोलिसमित्र संघटनेच्या एका कार्यक्रमादरम्यान साधला. 

पोलिसमित्र संघटनेच्या 30 व्या वर्धापन दिनानिमित्त शहर पोलिस दलातील अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार रविवारी करण्यात आला. या प्रसंगी बापट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कपोते, माजी आमदार मोहन जोशी यांच्या उपस्थितीत व बापट यांच्या हस्ते सहायक पोलिस आयुक्त जयश्री गायकवाड, भानुप्रताप बर्गे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड, राम राज माने, प्रभाकर शिंदे, ए. एस. चांदखेडे, उपनिरीक्षक रमेश काळे, प्रदीप जाधव, पोलिस शिपाई गणेश जगताप, "सकाळ'चे छायाचित्रकार विश्‍वजित पवार, राजलक्ष्मी सोशल फाउंडेशनच्या सुजाता चिंता आणि अपर्णा देशमुख यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. 

बापट म्हणाले, ""ब्रिटिशकाळात "पोलिसां'बद्दल जनमानसात निर्माण झालेली "शत्रू' भावना नागरिकांच्या मनातून काढून टाकण्यात आपल्याला अपयश आले आहे. समाजात शांतता, एकोपा, शिस्त टिकवणे हे पोलिसांचे काम असते. पोलिस संरक्षणासाठी असतात, आंदोलकांना मारण्यासाठी नाही. पोलिस म्हणजे समाजाचा मित्र, बंधू, समाजासाठी 24 तास काम करणारा माणूस असतो. त्यामुळे मोर्चा अडविणे पोलिसांचे काम नसते; पण अहोरात्र कर्तव्य बजावताना या पोलिसाला त्याच्या कुटुंबाची काळजी असते. त्याच्या अडचणी सोडविल्या, तर पोलिस त्यांचे कर्तव्य व्यवस्थित बजावू शकतील.'' 

""कधी कधी आंदोलकही टोकाची भूमिका घेतात. तसे न करता आंदोलनासाठी वेगळ्या अभिनव मार्गांचा अवलंब केला पाहिजे. आपल्या "गोड जिभेने' कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम पोलिस करू शकतात. पोलिसांनाही मन असते. तो पहिला माणूस असतो व नंतर पोलिस. आपल्या पोलिस बांधवांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत. माझ्या चाळीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनात मी पोलिसांतला माणूस अनेक वेळा पाहिला आहे,'' असे बापट म्हणाले. 

कपोते म्हणाले, ""शिक्षक मतदारसंघ असतो तसा विशेष पोलिस मतदारसंघ निर्माण करण्याची गरज आहे.''

Web Title: pune news girish bapat police