भाऊबीज आपुलकीचा संदेश देणारी - बापट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

पुणे - ‘‘विज्ञानातील प्रगतीमुळे नवीन संधी उपलब्ध झाल्या; मात्र त्याचवेळी आपण संस्कृतीपासून दुरावत आहोत की काय, असे वाटू लागले आहे. अशावेळी नात्यांमधील जिव्हाळा कायम राहावा, यासाठी प्रभात जन प्रतिष्ठानतर्फे राबविली जाणारी ही अनोखी भाऊबीज आपुलकीच्या नात्याचा संदेश देणारी आहे,’’ अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रतिष्ठानचा गौरव केला.   

प्रभात जन प्रतिष्ठान आणि प्रभात मित्रमंडळातर्फे शहराच्या पूर्व भागातील गरजू आणि निराधार महिलांसाठी ‘प्रभात आपुलकीची भाऊबीज’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर, सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर, नगरसेवक सम्राट थोरात, अजय खेडेकर, नगरसेविका विजयालक्ष्मी हरिहर, आरती कोंढरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर चव्हाण उपस्थित होते.

गावस्कर म्हणाल्या, ‘‘आयुष्य एकदाच मिळते ते सुंदर बनवा. दुःख आणि पराभव प्रत्येकाच्या आयुष्यात येतात; परंतु त्यामुळे खचून जाऊ नका. आपल्या मुलींना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन द्या. स्वाती महाडिक यांच्यासारख्या स्त्रियांचा आदर्श समोर ठेवून संकटांशी लढायला शिका. मदत करणारे लोक अनेक असतात; परंतु पुढे येण्याची हिंमत असली पाहिजे.’’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश कांबळे यांनी केले, तर मंगेश शिंदे यांनी आभार मानले.

Web Title: pune news girish bapat talking