धान्य वितरणात पारदर्शकता आणणार : गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

पुणे : धान्य वितरणात पारदर्शकता यावी, या उद्देशाने राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाने 'सप्लाय चेन मॅनेजमेंट'ही संगणकीकृत यंत्रणा विकसित केली आहे. या प्रणालीमुळे अन्नधान्य वाहतूक आणि वितरण यंत्रणेमध्ये पारदर्शकता  येणार असून संपूर्ण माहिती आता मोबाईलवरसुद्धा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

पुणे : धान्य वितरणात पारदर्शकता यावी, या उद्देशाने राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाने 'सप्लाय चेन मॅनेजमेंट'ही संगणकीकृत यंत्रणा विकसित केली आहे. या प्रणालीमुळे अन्नधान्य वाहतूक आणि वितरण यंत्रणेमध्ये पारदर्शकता  येणार असून संपूर्ण माहिती आता मोबाईलवरसुद्धा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

ऑनलाइन प्रणाली बद्दल माहिती देताना श्री बापट म्हणाले, 'यामुळे प्रत्येक गोडाऊन मधील अन्नधान्याचे व्यवस्थापन करता येवू शकते. तसेच कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला अन्न व पुरवठा विभागाकडून रास्त भाव दुकानदारांना किती अन्नधान्य वाटप केले हे पाहता येईल. धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रकचे चलन ही ऑनलाइन काढले जाईल, ज्यामुळे धान्य वाहतूक करणारा ट्रक भारतीय अन्न महामंडळ ते राज्य शासनाचे गोदाम तसेच गोदाम ते रास्त भाव दुकान किती वेळात पोहचतो याच्या नोंदी ठेवणे सोपे जाईल. तसेच ट्रक चालकाचे नाव, मोबाईल नंबर याची ही नोंद विभागातील अधिकाऱ्यांना ठेवता येईल. यामुळे धान्य घेवून जाणारा ट्रक कोठे थांबल्यास त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना समजेल. धान्य गोदामामध्ये येण्याआधी त्याचे वजन केले जाईल, त्यानंतर मागणीनुसार ज्या त्या रास्त भाव दुकानांना त्याचे वाटप केले जाईल. ऑनलाइन प्रणाली असल्याने या मध्ये काही तफावत असल्यास लगेच लक्षात येईल. या प्रणालीमुळे अधिकारी अन्य ठिकाणाहून मिळवलेल्या नोंदीही ठेवू शकतात. सध्या ही प्रणाली आपण साखरेच्या बाबतीत वापरत आहोत. 'सप्लाय चेन मॅनेजमेंट' मुळे रास्त भाव दुकानांसाठी परवाना घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.'

या प्रणाली द्वारे वेगवेगळ्या कार्यालयासाठी म्हणजेच जिल्हा अधिकारी कार्यालय, गोदाम  कार्यालय, विभागीय कार्यालय यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होईल. ऑनलाइन प्रणाली असल्याने सर्व लाभार्थींना धान्य घेतल्या नंतर एसएमएस येईल. ट्रक चलन निर्मितीमध्ये देखील कोणतीही अवघड कार्यपद्धती अवलंबली गेली नसून, पटकन चलन काढता येईल. येत्या महिन्यामध्ये Government Receipt Accounting System(GRAS)प्र णाली बसवली जाणार असून, अन्न धान्य विभागासाठी एक खिडकी योजना कार्यान्वयित करण्यात येणार आहे. यामुळे धान्याची चोरी आणि काळाबाजार बंद होऊन योग्य आणि गरजू व्यक्तींपर्यंत धान्य पोहचेल, असेही मंत्री बापट म्हणाले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news Girish Bapat will bring transparency in grain distribution