पुण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

धायरी येथून एका अडीच वर्षाच्या मुलीची अपहरण करून तिचा खून केल्याची घटना आज सकाळी उघडकिस आली आहे. आज सकाळी तिचा मृतदेह प्रायोजा सिटीच्यामागे आढळून आला. काही अज्ञात व्यक्तींनी श्रृतीचे अपहरण केले होते. याबाबत तिच्या आई वडीलांनी सिंहगड रोड पोलिसांत तक्रारही दिली होती.

पुणे : धायरी परिसरात श्रृती विजय शिवनगे (वय अडीच) या मुलीचे अपहरण करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11 ते 12 च्या दरम्यान तिच्या राहते घरातून अज्ञात इसमाकडून तिचे अपहरण करण्यात आले आणि तिचा खून करण्यात आला. ही मुलगी क्राॅस ओव्हर काउंटी सोसायटीमागे कुदळे चाळ लगड मळा वडगाव खुर्द येथे राहत होती. 

धायरी येथून एका अडीच वर्षाच्या मुलीची अपहरण करून तिचा खून केल्याची घटना आज सकाळी उघडकिस आली आहे. आज सकाळी तिचा मृतदेह प्रायोजा सिटीच्यामागे आढळून आला. काही अज्ञात व्यक्तींनी श्रृतीचे अपहरण केले होते. याबाबत तिच्या आई वडीलांनी सिंहगड रोड पोलिसांत तक्रारही दिली होती. मात्र आज सकाळी एका लहान मुलीचा मृतदेह धायरीतील प्रायोजा सिटीच्या पाठीमागे नागरिकांना मिळून आला. त्यांनी सिंहगड पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ती श्रृतीच असल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले असून पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत.

Web Title: Pune news girl kidnapped and murder