पुण्यात डंपरच्या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू 

दिलीप कुऱ्हाडे
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

भाग्यश्री नायर लूप रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात सिग्नलला उभ्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या शेजारी डंपर उभा होता. सिग्नलचा हिरवा दिवा लागताच भाग्यश्रीच्या दुचाकीला डंपरच्या पुढच्या चाकाची धडक बसली. त्यामुळे त्या खाली पडल्या त्यामुळे त्या डंपरच्या मागली चाकांच्याखाली चिरडल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पुणे : येरवडा परिसरातील शास्त्रीनगर चाैकात शनिवारी सकाळी डंपरची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात भाग्यश्री रमेश नायर (वय 27 ,रा.शुभम सोसायटी, वडगावशेरी) या युवतीचा मृत्यू झाला. डंपर चालक सागर नवनाथ चौगुले (वय 27, रा.वाघोली) या पोलिसांनी अटक केली आहे.

भाग्यश्री नायर लूप रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात सिग्नलला उभ्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या शेजारी डंपर उभा होता. सिग्नलचा हिरवा दिवा लागताच भाग्यश्रीच्या दुचाकीला डंपरच्या पुढच्या चाकाची धडक बसली. त्यामुळे त्या खाली पडल्या त्यामुळे त्या डंपरच्या मागली चाकांच्याखाली चिरडल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. डंपर चालक चौगुले याला पोलिसांनी अटक केले असून वाघोलीतील क्रिस्टल इन्फ्रा या कंपनीच्या मालकीचा डंपर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भाग्यश्री एका खासगी बँकेत नोकरीला होत्या. त्यांच्या पश्‍चात आई, वडिल व भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Pune news girl killed in accident