‘ससून’च्या पाणीगळतीचा मुलींच्या वसतिगृहाला ‘संसर्ग’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

पुणे - ससून रुग्णालयात जागोजागी पाणीगळती होत असल्याचा ‘संसर्ग’ बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाला झाल्याचे बुधवारी दिसून आले. पाणीगळतीच्या या डोकेदुखीमुळे वसतिगृहातील एक खोली कायमस्वरूपी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

ससून रुग्णालयात गर्भवती तपासणीच्या केंद्रापासून ते प्रयोगशाळेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी पाणीगळती होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे निधी नसल्याने याचा थेट फटका रुग्णांना बसत आहे. या बाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात या पेक्षाही गंभीर स्थिती असल्याची माहिती समोर आली आहे.

खोलीत पाण्याची डबकी
ससून रुग्णालयात पावसाचे पाणी ठिबकत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. तर, याच कारणामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील मुली त्रस्त झाल्या आहेत. मुलींच्या ‘एफ’ वसतिगृहाला चार-पाच वर्षांपूर्वी पाणीगळती रोखण्याचे उपाय केले. मात्र, याच वसतिगृहातील वरच्या मजल्यावरील एका खोलीच्या स्लॅबमधून अक्षरशः पावसाच्या पाण्याची धार लागते. त्यामुळे या खोलीत पाण्याची डबकी तयार होत असल्याची माहिती वसतिगृहातील मुलींनी दिली.

एक खोली कायमस्वरूपी बंद
पावसाळ्यात ठिकठिकाणी भितींमधून पाणी गळत असते. त्यामुळे एक खोली तर कायम स्वरूपी बंद ठेवावी लागली आहे. पावसाळ्यातील चार महिने तेथील मुलींच्या राहण्याची कोणतीच पर्यायी व्यवस्था आयत्या वेळी करता येत नसल्याने ती खोली कोणत्याच मुलीला दिली जात नाही, अशी माहिती वसतिगृह प्रमुखांनी दिली.

पावसाळ्यात पाणीच पाणी
खोलीत पाणी गळत नाही, अशा जागेत खाट हलवून तेथे रात्र काढावी लागते. पावसाळ्यात कधी-कधी सर्व बाजूंनी खोलीत पाणी येते, अशी व्यथा एका मुलीने बोलून दाखविली.

निधीअभावी दुरुस्ती रखडली
वसतिगृहाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निधीचा अभाव, हेच कारण पुढे करत सार्वजनिक बांधकाम खात्याने आपले हात वर केले. राज्य सरकारकडून सार्वजनिक बांधकाम खात्याला गेल्या वर्षभरात निधी मिळाला नाही. त्यामुळे कोणतीही कामे करता आली नाहीत. ससून रुग्णालयासह या वसतिगृहाचाही यात समावेश आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: pune news girls hostel problem by sasoon water leakage