आव्हानात्मक अभ्यासक्रमात तरुणींची झेप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

पुणे - बारावीत रोहिणीने चांगले गुण मिळविले. त्यानंतर तिने आव्हानात्मक क्षेत्रात करिअर करण्याचे ठरविले. त्यानुसार पुरुषी शिक्का असलेल्या ‘चारचाकी-दुचाकी गाड्यांची दुरुस्ती’चे क्षेत्र निवडले आणि ते पूर्णदेखील केले. रोहिणीच नव्हे, तर तिच्यासारख्या अनेकजणी अशा प्रकारच्या आव्हानात्मक क्षेत्रात करिअर करताना दिसत आहेत.

मुलींनी केवळ घरकामासाठी उपयुक्त असेच अभ्यासक्रम शिकावे अथवा घरी बसावे, हा विचार फार जुना झाला असून, हल्ली अनेकजणी ‘केवळ पुरुषांसाठी’ असे समजले जाणारे अभ्यासक्रम निवडून त्यामध्ये स्वत:ला सिद्धदेखील करत आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम किंवा कामावरील पुरुषी शिक्‍का पुसला जात आहे.

घर सजवट ते ‘सेट’ उभारणी
सायकल, दुचाकीपासून अगदी विमान दुरुस्तीपर्यंत आणि स्वत:चे घर सजविण्यापासून एखाद्या चित्रपटाचा भव्य ‘सेट’ उभारण्यापर्यंत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत महिला, तरुणींनी त्यात यशस्वी होत आहेत. पारंपरिक अभ्यासक्रमापेक्षा अभियांत्रिकी क्षेत्रातील काँक्रीट तंत्रज्ञान, आधुनिक बांधकाम तंत्र आणि व्यवस्थापन, फोम वर्क आणि बार बेंडिंग आदी विषयांकडे तरुणींचा कल वाढला आहे.

या अभ्यासक्रमांना पसंती
इलेक्‍ट्रिकल या अभ्यासांतर्गत विद्युत अभियांत्रिकीमध्ये उपयोगात येणारी उपकरणे, घरगुती उपकरणे, विद्युत यंत्रसामग्री, वीजपुरवठा, उच्च दाब, कमी दाब आणि उपकेंद्रामध्ये कार्यरत उपकरणांची देखभाल-दुरुस्ती; इलेक्‍ट्रॉनिक्‍स अभ्यासक्रमांतर्गत रेडिओ, ऑडिओ, व्हिडिओ सिस्टीम अँड अप्लायन्सेस, तर ऑटोमोबाइल अभ्यासक्रमांतर्गत वाहनांची देखभाल-दुरुस्ती, डेटिंग, पेंटिंग अँड वेल्डिंग ऑफ ऑटोमोबाइल्स आणि क्रिएटिव्ह कार डिझायनिंग अशा अभ्यासक्रमांसाठी महिला आणि तरुणींचा सहभाग वाढत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपटांचे ‘सेट’ उभारणी, वाइल्ड लाइफ फोटोग्राफी, चित्रपट दिग्दर्शन यासारख्या हटके परंतु आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडण्याकडेही महिला व तरुणींचा कल आहे.

दुचाकी, मोटार बिघडली तर ती कशी दुरुस्त करावी, याबाबत जाणून घेण्याचे कुतूहल होते. त्यातूनच या संदर्भातील अभ्यासक्रम करण्याचे ठरविले. शिकता शिकता ‘पार्ट टाइम’ नोकरी करून पैसे ही कमावता येते.
- आरती त्रिभुवन, प्रशिक्षणार्थी तरुणी

गाड्यांची दुरुस्ती, विद्युत उपकरणांची दुरुस्ती यांसारखे तीन ते सहा महिने या कालावधीतील आव्हानात्मक अभ्यासक्रम महिलांसाठी चांगला पर्याय ठरत आहे. वेगळे काहीतरी करता येते, शिवाय चांगले पैसेही मिळतात. त्यामुळे तरुणी व महिला या अभ्यासक्रमाला पसंती देतात. बऱ्याच जणींनी या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आहे.
- सं. बा. कांबळे, प्रशिक्षक, नागरवस्ती विकास योजना, महापालिका

Web Title: pune news girls Teenage leap in challenging curriculum