अन्‌ तो ठरला सुवर्णपदकाचा मानकरी ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पुणे - लाखो संकट समोर उभी ठाकली होती... त्याचे स्वप्न मात्र होते उच्च शिक्षणाचे. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत. वडील शेतमजूर. केळीचे घड वाहून मिळणाऱ्या पैशांत त्यांनी त्याला त्याच्या भावंडांसह शिकवलं. त्यानेही वडिलांच्या कष्टांना साथ देत शिक्षण चालूच ठेवले... दिवसरात्र आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहिला... आणि एके दिवशी तो जिंकला आणि ठरला सुवर्णपदकाचा मानकरी !... ही कहाणी आहे जळगाव जिल्ह्यातील वाघोडच्या गोकूळ महाजन याची. 

राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (एनआयटी) तिरुचिरापल्ली येथून रसायनशास्त्र अभियांत्रिकीमधील सुवर्णपदक पटकावत बाहेर पडलेल्या गोकूळशी राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त "सकाळ'ने संवाद साधला. त्या वेळी त्याच्या खडतर पण लखलखीत प्रवासाविषयी जाणून घेता आले. 

गोकूळ म्हणाला, ""मी माझ्या यशाचे श्रेय आई-वडिलांना देतो. माझ्या शिक्षकांचा या यशात मोलाचा वाटा आहे. माझ्या मामा व मावशी यांनी वेळोवेळी मदत केल्याने यशाचा मार्ग सुकर झाला.'' 

Web Title: pune news gokul mahajan